इंदिरा गांधी रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागातील एसी बंदमुळे रुग्णांचे हाल

इचलकरंजी / प्रतिनिधी

 इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयातील अत्याधुनिक 16 बेडच्या अतिदक्षता विभागातील  एसी बंद पडल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत  गेल्या सहा महिन्यापूर्वी करोड  रुपये खर्च करून हा आयसीओ विभाग सुरू करण्यात आला होता पण एसी मध्ये लगेच बिघाड होऊन AC  बंद पडला आहे त्यामुळे तेथील रुग्णांना दुसऱ्या वार्डातील आयसीयू मध्ये शिफ्टिंग करण्यात आले आहे.शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळाव्या यासाठी इंदिरा गांधी रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे  हे रुग्णालय   साडेतीनशे बेडचे बांधण्यात आले आहे या ठिकाणी राज्य सरकार द्वारे नागरिकांना सुविधा दिल्या जात आहेत या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापूर्वी अत्याधुनिक  16 बेडचे  अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले  होते  करोड रुपये खर्च करून हा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागाची व रुग्णांची सेवा सुरू आहे पण काल संध्याकाळी अचानकपणे अतिदक्षता  विभागातील एसी बंद पडल्यामुळे तेथील रुग्णांना मोठा त्रास होऊ लागला आहे  अतिदक्षता विभागात   24 तास एसी सुरू असतो पण येथील सेंटर एसीच्या  मोटरमध्ये बिघाड झाल्यामुळे ac  पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे  रुग्णांचे मोठे  हाल होत होते याची माहिती डॉक्टरांना   मिळताच डॉक्टरांनी येथील रुग्णांना दुसऱ्या अतिदक्षता विभागामध्ये  मध्ये हलवण्यात आले आहे गेल्या काही महिन्यापूर्वी राज्य सरकारकडून सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता  विभाग  सुसज्जपणे सुरू करण्यात आले आहे पण या ठिकाणी अतिदक्षता विभागला जर काही प्रॉब्लेम जर झाला तर त्या ठिकाणी दुसरी व्यवस्था असणे  गरजेचे असते पण सरकारी रुग्णालय म्हणजे सरकारी काम सहा महिने थांब अशी  गत आता सरकारी रुग्णालयांची झाली आहे ac  बंद पडल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले पण डॉक्टरांनी वेळेत त्यांना इतरत्र हलवल्यामुळे रुग्णांनी डॉक्टर व तेथील सिस्टर यांचे आभार मानले आहेत पण एसी मधील बिघाड होऊन पूर्णपणे एसी बंद पडला आहे त्यामुळे या कामाचा दर्जा काय आहे कसा आहे हे यातून  मात्र दिसून आले आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी अतिदक्षता विभागाचे  दिमाखात उद्घाटन रुग्णालयातील प्रशासनाने केले  होते  जर या ठिकाणी दुसरा अतिदक्षता  विभाग जर नसता तर आज रुग्णांच्या जीवावर बेतले  असते ज्या मक्तेदाराने या आत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे काम केले आहे त्यांनी कसे काय काम केले याचा कामाचा दर्जा काय आहे याची चौकशी केली नाही का? का रुग्णांच्या जीवाच्या जीवाचा  खेळ करायचा हे अधिकाऱ्यांनी   ठरवल आहे का? त्यामुळे आजी-माजी आमदार लोकप्रतिनिधींनी इंदिरा गांधी रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग मधील एसी बंद  पडल्याची चौकशी लावणार का? अशा भ्रष्टाचार करणाऱ्या मक्तेदारावर  कारवाई करण्याची मागणी सध्या सामाजिक कार्यकर्त्यातून होऊ लागली आहे  इंदिरा गांधी रुग्णालय म्हणजे सर्वसामान्यांचे व गरिबांचे  रुग्णालय म्हणून ओळखले जाते पण त्याच ठिकाणी जर त्यांचे  हाल होत असतील तर रुग्णांची कशी काय सेवा शासन करणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे नूतन आमदार राहुल प्रकाश आवाडे हे  याकडे लक्ष देणार का? झालेल्या घटनेची चौकशी करणार का? असा सवाल सध्या सर्वसामान्य जनतेने विचारला आहे.

Spread the love
error: Content is protected !!