इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील बांधकाम कामगारांची पूर्वीप्रमाणे ऑनलाईन नोंदणी चालू करावी व सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे व कामगार मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार रूपये बोनस मिळावे व पेंडींग कामे त्वरीत निकाली काढावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. बांधकाम कामगारांचे मंडळ २०१३ ते २०१४ साली स्थापन झाले आहे. बांधकाम कामगारांचे कोट्यावधी रूपये महाराष्ट्र शासनाकडे जमा आहेत. तरी बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापन झाले पासून बांधकाम कामगार हा रजिस्टर कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये जावून ऑफलाईन फॉर्म भरत होता. नंतर २०२१ साली ऑफलाईन बंद करून ऑनलाईन फॉर्म भरणेचे काम चालू होते. तरी आता सध्या कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर ई-महा सेवा केंद्रामध्ये बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म भरत होता. तरी निवडणूका झालेपासून सर्व पोर्टल बंद करून फक्त सेतूमध्ये स्वतः बांधकाम कामगार जावून फॉर्म भरणेचे पोर्टल चालू केले आहे. तरी महाराष्ट्रामध्ये अनेक कामगार संघटना रजिस्टर आहेत. तरी रजिस्टर कामगार संघटनेला ऑनलाईन फॉर्म भरणेची परवानगी द्यावी. तसेच सुप्रिम कोर्टाने बांधकाम कामगारांना दिपावली बोनस (सानुग्रह अनुदान) म्हणून पाच हजार रूपये महाराष्ट्र सरकारने द्यावे असा आदेश दिला आहे. तसेच कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रूपये दिपावली बोनस पाच हजार रूपये देण्याचे जाहीर केले होते. तरी ते पाच हजार रूपये बांधकाम कामगारांच्या खात्यात पाठवले नाहीत व बांधकाम कामगारांची गेली
अनेक महिने झाले बरेच नवीन नोंदणी रिनिव्हलचे अर्ज अजुन पेंडींग आहे ते लवकरात लवकर तपासून निकाली काढावे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी इचलकरंजीमध्ये वाटप करावे. तसेच सदरच्या अर्जामध्ये किरकोळ त्रुटी काढू नये या सर्व मागण्याचे निवेदन आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आले देत आहोत. तरी या सर्व मागण्याची पुर्तता लवकरात लवकर करावी व सर्व बांधकाम कामगारांचे ऑनलाईन अर्ज पूर्वीप्रमाणे रजिस्टर कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये भरण्यास परवानगी द्यावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी राजेंद्र निकम, सद्दाम मुजावर,केपान्ना हालगेकर,इम्तियाज शेख, मेहबूब गवंडी,बेगम नदाफ,सलमा शेख,पूजा पोवार, शाहीन खानापुरे यांच्यासह शहरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.