आंदोलन अंकुश संघटनेच्या ऊस लढ्यास यश
आंदोलन अंकुश संघटने कडून गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षी येणाऱ्या उसात ३१००/ रुपये दर द्यावा अन्यथा ऊस
वाहतूक रोखणार अशा आशयाचे निवेदन देऊन सर्व कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा केली होती.त्याअनुशगांने आज प्रथम वेंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट बेडकीहाळ या कारखान्याच्या
प्रशासनाने तशी मागणी मान्य करून पत्र प्रसारित केले आहे.कर्नाटकातील कारखान्याचा सरासरी एफ आर पी २८५०/ प्रती टन असून सुद्धा त्यापेक्षा २५० रुपये जास्त पहीली उचल
मिळत आहे हे फार मोठे यश आहे.त्याचबरोबर नणदी शिवशक्ती कागवाड या कारखान्यांना सुद्धा निवेदन दिलेली असुन त्यांनी त्यांचा निर्णय अद्यापी जाहीर केलेला नाही त्यामुळे्
उद्यापासून सदर कारखान्यांची महाराष्ट्र हद्दीतून होणारी ऊस वाहतूक निर्णय होऊ पर्यंत रोखली जाइल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांनी दिला आहे.