स्व. सा. रे. पाटील यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसदार गणपतराव पाटीलच
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे प्रतिपादन
बदल हवा तर आमदार नवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा केले आवाहन
जयसिंगपूर / प्रतिनिधी
स्व. सा.रे.पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली.तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले.त्यांचा खरा राजकीय,सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच हे इथेच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही.गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मदत करून आमदार केले,ते भाजपाचे आहेत? शिंदेचे आहेत? की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे. आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल
काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला.तसेच जातीय तेढ, समाजात भांडणे लावण्याचा एकमेव अजेंडा महायुतीचा आहे. आपले भवितव्य सुखकारक करण्यासाठी आणि भविष्य घडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.बदल हवा तर आमदार हवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा. संयमी, सुसंस्कृत, सर्वांना भेटणारे आणि कामे करणारे नेतृत्व गणपतराव पाटील यांना विजयी करा, आमची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाहीही सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली.शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित जाहीर प्रचार ते बोलत होते.यावेळी प्रा. सुकुमार कांबळे, रघुनाथ देशिंगे, विजय धुळूबुळू, आण्णासाहेब हावले, जेष्ठ पत्रकार निरंजन टकले, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, राजू वडर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.गणपतराव पाटील यांनी आपण आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि जनतेचा आमदार म्हणून काम करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.स्वागत प्रास्ताविक अमरसिंह नाईक यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले.
चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी आभार मानले.
यावेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक साके शैलजानाथ, ठाकरे शिवसेनेचे चंगेजखान पठाण, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, बाजीराव मालुसरे, मधुकर पाटील, कॉ.आप्पा पाटील, अशोकराव कोळेकर, रघुनाथ पाटील, सर्जेराव पवार, भवानीसिंह घोरपडे, हसन देसाई, संजय पाटील कोथळीकर, मुसा डांगे, युनूस डांगे, दिलीप पाटील कोथळीकर, माजी नगराध्यक्षा अनिता कोळेकर, दत्तच्या संचालिका अस्मिताताई पाटील, स्वाती सासणे, अर्चना संकपाळ, स्नेहा देसाई, वरूण पाटील, संतोष जाधव, गुंडाप्पा पवार, सलीम नदाफ, संजय अनुसे, दिलीप पाटील, दिगंबर सकट, गौतम वाघवेकर, ऍड. इंद्रजित कांबळे, राजू आवळे, मिनाज जमादार, सुनीता पवार, शिवराज पाटील, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, अरविंद धरणगुत्तीकर, सतीश भंडारे, दस्तगीर जमादार, नागेश कोळी, सतीश देसाई, वसंतराव देसाई, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, बाबासाहेब नदाफ, लक्ष्मण धोत्रे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ, मतदार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.