मजले येथे पाणीपुरवठ्यासाठी काढलेल्या चाचीत शाळेची बस अडकली

कुंभोज : विनोद शिंगे

कुंभोज हातकलंगले रोड वरती असणाऱ्यांनी शिवपुरी येथे आज एका इचलकरंजीतील नामांकित शाळेची बस घसरून रस्त्याच्या कडेला चाचित जाऊन अडकून बसल्यामुळे मोठा अपघात व

अनथ टाळला.सदर चाच मजले येथे पाणीपुरवठा नेण्यासाठी काढण्यात आली असून कामाच्या ठेकेदारांनी तीचाच पूर्ण क्षमतेने भरली नसल्याणे दररोज सदर चाची मध्ये अडकून

छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिणामी आज बसचा मोठा अपघात झाला असता तर अनेक विद्यार्थ्यांना धोका पोहोचला असता.परिणामी मजले ग्रामपंचायतीने सदर ठेकेदारांना योग्य

त्या सूचना देऊन रस्त्याच्या कडेला काढलेली चाच पूर्ण क्षमतेने मुजवण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उपस्थित यांच्यातून केली जात होती.

परिणामी कुंभोज येथे ही आज सदर चाचीमध्ये मालवाहू टेम्पो अडकून बसल्याने बराच वेळ वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.मजले येथे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदी कुंभोज येथुन सदर पाईपलाईन नेली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

परंतु सदर पाईपलाईन खुदाई करून ती मुजवण्याचे काम सदर कामाच्या ठेकेदाराचे असून ठेकेदाराने ती मुजवताना चालढकल केल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून यामध्ये

मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे सदर कामाच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नागरिकांच्यातून सध्या जोर धरत आहे.

Spread the love
error: Content is protected !!