श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसास उत्साहात प्रारंभ
रांगोळी कॅरम व्हाँलीबॉल मोटरसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळविण्याच्या स्पर्धा संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
श्री बुवाफन महाराज की जय श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या जयघोषात सकाळी श्री बुवाफन महाराज मंदिरात समाधीस्थळास महाअभिषेक घालून व पूजा करण्यात आली
आणि रात्री समाधीस्थळास गंध लावून मानाचा गलिफ अर्पण करून श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसास धार्मिक व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.उत्सव व
उरुसानिमित्त महिला व पुरुष गटाची रांगोळी,दुहेरी कॅरम, डायरेक्ट व्हाँलीबॉल या स्पर्धा आणि मोटरसायकलबरोबर म्हैस व रेडकू,पळविण्याच्या शर्यती उत्साहात संपन्न झाल्या.
सोमवारपासून शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसास सुरुवात झाली.सकाळी श्री बुवाफन महाराज मंदिरात मंदिराचे स्वामी राजशेखर हिरेमठ, अशोक हिरेमठ,महंतय्या हिरेमठ,अमोल हिरेमठ,श्री वीरशैव
लिंगायत व माळी समाज आणि भक्तगणाच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराज यांच्या समाधीस महाअभिषेक घालून पूजा करण्यात आली.श्री बुवाफन महाराज की जय,श्री बुवाफन
महाराज की दोस्तारो धिनचा जयघोष करीत भक्तगणांनी समाधी
स्थळाचे दर्शन घेतले.मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्रीराम मंदिरात महिलांच्या रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने, यांच्या हस्ते सौ ज्योत्स्ना यादव,गायत्री मुळीक,अन्नपूर्णा कोळी,
श्रीमती जयश्री धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला तसेच पुरुष गटातील रांगोळी स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला दोन्ही गटातील स्पर्धकांनी रेखीव आणि आकर्षक रांगोळी काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
महसूल भवन येथे दुहेरी गटातील कॅरम स्पर्धा सुरू झाल्या मिरासो बागडी,दिगंबर चुडमुंगे,संदीप कराळे,महेश देशिंकर,महेश मोरे,चंद्रशेखर पाटील बारवाडकर,अतिश बिंदगे,रवींद्र धुपकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला.
जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागील मैदानात डायरेक्ट व्हाँलीबॉल स्पर्धा सुरू झाल्या नामदेव सन्नके,शशिकांत चव्हाण ,अरुण कांबळे,सुरेश चूडमुंगे डॉ अतुल पाटील,राजू खलिफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुष्पक चित्र मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर मोटरसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळविण्याच्या शर्यती संपन्न झाल्या बाबासाहेब माने,शिवाजी माने,निळकंठ गावडे,संदीप महात्मे,नामदेव काळे विजय काळे,कुमार पिसाळ,अनिरुद्ध कोळी,नंदकिशोर फल्ले,पवनसिंह पाटील,गजानन सावंत,मनोहर बाबर,अशोक चुडमुंगे,मच्छिंद्र कुंभार,महेश हारगे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री श्री बुवाफन महाराज यांच्या समाधीला गंध लावणे व मानाचा गलिफ अर्पण करणारा गंधरात्र हा धार्मिक सोहळा अमाप उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने हिरेमठ स्वामी महाराज यांच्या घरापासून मंदिरापर्यंत मानाच्या गलिफाची
मिरवणूक काढण्यात आली वीरशैव लिंगायत माळी समाज हिरेमठ स्वामी महाराज गावातील प्रमुख मानकरी व दिवटीचे मानकरी आणि सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री बुवाफन महाराज की जय श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या जयघोषाने अखंड परिसर दुमदुमून गेला.
रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर आर्केस्ट्रा विश्व अप्सरा यांचा बहारदार असा करमणुकीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस साजरा करण्यासाठी उत्सव व उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे,यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव व उरूस
संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी,खजिनदार राहुल कोळी,सचिव किरण जगताप ,ऑडिटर पिराजी जयान्नावर,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे
कार्याध्यक्ष संतोष घाडगे,संयोजक लखन कुंभार,सहसंयोजक सागर कांबळे,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी,सहखजिनदार कुमार जयान्नावर,नितीन कोळी,
सहऑडिटर प्रताप जगदाळे,सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.