‘या’ राशीच्या लोकांना रविवार शुभ,पहा तुम्हचे राशी भविष्य

मेष – राशी

पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.रखडलेल्या कामांना गती मिळेल.पैशाची कामे रखडतील, प्रवासाचीही शक्यता आहे.विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे.प्रेम जीवनासाठी हा आठवडा चांगला जाणार आहे.आज तुमच्या प्रेम जोडीदाराची साथ मिळेल.

वृषभ – आज कामाचा ताण पडेल,घरातील जुन्या वादातून उणीदुणी यामुळे त्रास होईल.कोणतीही गुंतवणूक करताना सल्ला घ्या घाईगडबड निर्णय नको,जुन्या सदस्यांना भेट होईल.पैशाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळेल.तुमची विश्वासार्हता दिसेल.आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या.श्‍वसनाशी खबरदारी घ्यावी.प्रेम काही चढ-उतार होतील,सासरच्या व्यक्तींसोबत वादाची प्रसंग.विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे,हनुमानजींच नामस्मरण करा

मिथुन – आजच्या दिवस रागावर नियंत्रण ठेवा.तुमच्या संयमाची परीक्षा असेल,तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने सर्व अडचणींवर मात कराल.कर्ज घेणे टाळा,नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.व्यवसायिक।मंडळींना संघर्ष करावा लागेल.कामानिमित्त प्रवासाचीही घडेल.आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील.विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.

कर्क – आज धार्मिक कार्यात सहभाग घ्याल,मनापासून देवाचे नामस्मरण केल्याने श्रद्धा वाढेल.कुटुंबासोबत घरगुती कार्यक्रमात सहभागी व्हाल.आज तुमचे मन चांगले व प्रसन्न राहील.व्यवसाय गुंतवणुकीतील अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळतील शक्यता,जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटेल,नोकरीत प्रगती होऊ शकते,व्यवसायिकांना नवीन ऑर्डर मिळतील,संधींचा फायदा घ्या.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस

सिंह – आज दिवसभर मन प्रसन्न राहील.चांगली बातमी मिळेल.पैशाच्या दृष्टीने चांगला दिवस असेल.व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता,नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना थोडी वाट पहावी लागेल.आरोग्याबाबत काळजी घ्या,प्रलंबित असलेले निकाल लागतील.तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा,शांत राहण्याचा प्रयत्न करा.आज सकाळी सूर्याची उपासना करा,तुम्हाला फायदा होईल.

कन्या – आज तुमची फसवणूक होऊ शकते.खोटे बोलणाऱ्यांपासून सावध रहा.आज तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळू शकते,विचारपूर्वक निर्णय घ्या.नोकरीत बदली शक्यता,वरिष्ठांना खुश ठेवा.आरोग्याची काळजी घ्यावी,बँकेच्या कर्जाच्या समस्या थोडे कायम राहणार,व्याजाने कर्ज देणे टाळा.विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागेल.

तुळ – आजच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर आहे.पैशाची आवक वाढ होईल. विवाह समारंभात सहभागी व्हाल,घरात आनंदाचे वातावरण असेल.तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.वैवाहिक जीवन आनंदी राहील.मात्र तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना थोडी अधिक मेहनत करावी लागेल.चांगल्या नोकरीची संधी मिळेल

वृश्चिक – आज तुम्हाला प्रसन्न वाटेल,तुम्हाला कोणत्याही आजारापासून आराम मिळेल,तांत्रिक क्षेत्रातील लोकांना लाभ मिळेल.सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे काम करणाऱ्यांना मोठी संधी,वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल.वैवाहिक जीवनात उत्साह राहील.प्रेम मंडळींना दिवस चांगला राहील.रागाववर नियंत्रण ठेवा,नोकरीच्या ठिकाणी हित शत्रू वरिष्ठांना कडून संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करतील काळजी घ्या

धनु – आजचा दिवस व्यवसायात चांगली वाढ देणारा ठरेल.अडकलेली कामे पूर्ण होतील,आर्थिक लाभ होण्याची शक्यता.राजकारणी लोकांना महत्त्वाचा दिवस.पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील.गायन आणि लेखनाशी संबंधित लोकांसाठी आनंद देणारा दिवस असेल,अविवाहितांच्या आयुष्यात लव्ह लाईफमध्ये आनंद मिळेल.आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल,

मकर – तुमच्यासाठी आव्हान देणारा दिवस सावधगिरी बाळगण्याची गरज.व्यवसायाशी संबंधित लांब प्रवासाचीही शक्यता,आरोग्याच्या दृष्टीने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.आर्थिक लाभाची परिस्थिती चांगली,पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. शनि तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुम्हाला प्रगती हवी असेल तर आळस टाळा.तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी विश्रांती घ्या

कुंभ – प्रलंबित कामे पूर्ण होतील.वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील,नवीन जमीन,इमारत,दुकान इत्यादी खरेदीचा योग असेल,नोकरीच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार. नियोजन करून काम करा.कोणताही व्यवहारात बोलण्यावर नियंत्रण ठेवा,राजकारणी मंडळींना उत्तम दिवस
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल,

मीन – करिअरच्या बाबतीत दिवस चांगला नवीन नोकरीच्या शोधासाठी हा आठवडा चांगला आहे.मुलींच्या लग्नासाठी चांगली बातमी मिळेल.नवीन व्यवसायासाठी जमीन आणि इमारत खरेदी करण्याची नियोजन कराल.शेअर बाजारातून फायदा होईल. नवीन लोकांबद्दल संशोधन कराल,विद्यार्थ्यांसाठी थोडा कठीण दिवस.राजकारणी मंडळींना अचानक मोठा फायदा.तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूड असेल त्यामुळं दिवस प्रसन्न असेल.

Spread the love
error: Content is protected !!