1600 हून अधिक महिलांची उपस्थिती
निपाणी / प्रतिनिधी शिवाजी भोरे
महिलांना आत्मनिर्भर हे माझे ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात.यापुढील काळात देखील महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने नवनवीन उत्पादने बनवता यावीत यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या काळात निपाणी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात महिलांचे गृह उद्योग उभे करण्याचा माझा मानस असल्याचे आम सौ.जोल्ले यांनी सांगितले.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांनी महिलांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.याप्रसंगी धारवाडच्या शर्मा इंडस्ट्रीजचे किशन शर्मा यांनी मशिनरी व उत्पादना संदर्भात प्रेझेंटेशन दिले
एक हाक आणि हजारो महिलांची साथ निपाणी मतदारसंघात
प्रत्येक घराघरात महिलांना गृह उद्योग देऊन त्यातून तयार झालेल्या उत्पादनाचा एक वेगळा ब्रेड तयार करून तो देशभरात नव्हे तर परदेशामध्ये विकण्याचा दृष्टीने जोल्ले उद्योग समुह सातत्याने प्रयत्न करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज त्या संदर्भात महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.त्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी महिलांना एक हाक दिली त्या हाकेला हजारो महिलांनी उपस्थित राहून साथ दिली. मराठा मंडळ सभागृह खचाखच भरले होते.
गृह उद्योग मशनरी, विक्री या संदर्भात महत्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली.त्या निपाणी येथील मराठा मंडळ येथे महिलांसाठी विविध गृह उद्योग आणि त्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कापूर,अगरबत्ती, धूपस्टीक,पत्रावळी,वाती अशा अनेक वस्तू बनवण्यासाठी लागणारी मशिन्स,कच्चा माल व अनुदान यासंदर्भात माहीती देण्यात आली.याप्रसंगी विभावरी खांडके,राजु गुंदेशा,विनायक पाटील,चंदन मुराबट्टे,विश्वनाथ पलेड आदी उपस्थितहोते.सूत्रसंचालन विजय राऊत यांनी केले.