जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे सवाल उत्साहात
यजमानपदी मनीष कुसनाळे : पिंच्छी परिवर्तनाचा कार्यक्रम
जयसिंगपूर, ता.१ जयसिंगपूरमधील हेरवाडे कॉलनी येथील श्री १००८ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये ता.३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ ला होणा-या श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाच्या यजमान पदाचा सवाल धर्मानुरागी मनीष मनोहर कुसनाळे यांनी मिळविला.
यावेळी परमपूज्य १०८ प्रभाचंद्रनंदीजी महाराज व परमपूज्य १०८ समंतभद्रनंदीजी महाराज यांचे पावन सानिध्य लाभले.
सवालाची सुरवात प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेसमोर व्दिपप्रज्वलन सौ. सुनिता चौगुले व महिला मंडळाच्या महिलांना केला. धनपाल बेळंकी यांनी भगवंतासमोर श्रीफळ चढविले.
या महोत्सवातील सौधर्म इंद्र-इंद्राणी मनीष कुसनाळे (अरिहंत कॉलनी) यांनी मिळविला. धनपती कुबेर धनपाळ बेळंकी, यज्ञनायक दिग्विजय चौगुले, ईशान्य इंद्र-इंद्राणी सुरेश भोकरे, सानतकुमार इंद्र-इंद्राणी प्रकाश देसाई,
माहेंद्र इंद्र-इंद्राणी सुमती पाटील यांनी मिळविला. अष्टकुमारीकाचा मान आदिती सिदनाळे,शुभ्रा चौगुले,श्रृती हेरले, तन्वी उपाध्ये,प्राप्ती किणीकर,अकिंता मुरगुंडी,स्नेहल दत्तवाडे, श्रृतिका लठ्ठे यांनी मिळविला.
मंदिरासमारील ध्वजारोहण करण्याचा सुरज बुरसे (संभाजीपूर), मंडपासमोरील ध्वजारोहण चिन्मय चौगुले यांनी मिळविला. मंडप उदघाटन कुमार चुडाप्पा, मंगल कलश स्थापना प्रफुल्ल पाटील (संभाजीपूर), दीपप्रज्वलन शितल पाटील,
वेदीवर जिनबिंब स्थापन विमल मानकापुरे करणार आहेत. प्रथमदिन सकाळी जलकुंभ आणण्याचा मान सौरभ चुडाप्पा यांनी मिळाविळा. यावेळी ध्वज घेवून घोड्यावर बसण्याचा मान रिवा पाटील, रिहा बेळंकी, स्वरित टकुडगे, चंदन चौगुले, पार्श्वनील दत्तवाडे यांनी मिळविला.
यावेळी प्रभाचंद्रनंदीजी महाराज व समंतभद्रनंदीजी महाराज यांचे पिंच्छी परिवर्तन कार्यक्रम झाला.पिंच्छी परिवर्तनाचा मान निर्मला उपाध्ये,सुशिला मगदूम,शास्त्रदान चंदन चौगुले,धनपाल बेळंकी, पादप्रक्षालन सविता चौगुले व दिग्विजय चौगुले यांनी घेतला होता.
सवाल सम्राट पंकज जैन यांनी सवाल काढला. प्रतिष्ठाचार्य सम्मेद उपाध्ये,संगितकार विद्यासागर बडबडे, मंदिर कमिटीचे पदाधिकारी,सदस्य,जयसिंगपूर व परिसरातील श्रावक-श्राविका उपस्थित होते.