कुरुंदवाड / प्रतिनिधी
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार कुरुंदवाड परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील नगरपरिषद चौकामध्ये आज दि.1 डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषणाची सुरुवात सकल मराठा समाजातील समाज बांधवांनी शिवतीर्थ येथे एकत्र जमा होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व नगरपरिषदेच्या चौका मध्ये उपोषण स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास समाज बांधवांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी युवा नेते अभिजीत पवार दयानंद मालवेकर, बी.बी. सूर्यवंशीसर,गोपाळ चव्हाण,तुकाराम पवार,रावसाहेब आलासे,बंडू उमडाळे,शिवाजी रोडे,वैभव उगळे आदींनी मनोगते व्यक्त केली.साखळी उपोषण दररोज 11 ते 1 वाजेपर्यत होणार असून मनोज जरांगे यांचा
पुढील आदेश येईल तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे.कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय हे आंदोलन आता स्थगित होणार नाही.या बेमुदत साखळी आंदोलनामध्ये सर्व समाज बांधवांनी व विविध समाजातील घटकांनी सहभागी
व्हावे असे आव्हान पश्चिम महाराष्ट्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे अध्यक्ष युवा नेते अभिजित पवार यांनी केले या वेळी सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.