फटाक्याची ठिणगी पडून गवताची होळी पेटली

बांबवडे / प्रतिनीधी

खुटाळवाडी ता.शाहूवाडी येथील वसंत तुकाराम खुटाळे यांच्या गवताच्या दोन होळ्यांना आग लागून सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की खुटाळवाडी येथील वसंत खुटाळे यांनी घराशेजारी जनावरांसाठी गवताच्या होळ्या रचून ठेवल्या होत्या.रात्री गावातील एका नागरिकाने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गावातील महादेव मंदिरासमोर फटाक्या लावल्या यातील फटाक्याची ठिणगी जवळ असणाऱ्या होळीवर जाऊन पडली आणि होळीने पेट घेतला बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक तरुणांनी धाडसाने घराशेजारी असणाऱ्या बोअर सुरू करून व ट्रॅक्टर मधून पाणी आणून आग आटोक्यात आणली.गावचे पोलीस पाटील खोत यांनी या घटनेची माहिती मलकापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवली परंतु घटनास्थळी अग्निशामक दल येईपर्यंत तरुणांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यात यश मिळवले होते.वर्षभरासाठी जनावरांना लागणारा चारा आपल्या डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने वसंत खुटाळे यांना अश्रू अनावर झाले.

Spread the love
error: Content is protected !!