शिरोळात आज गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

शिरोळ / प्रतिनिधी

 

येथील ओम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जगदाळे गल्ली येथील गणेश मंदिरात हा धार्मिक सोहळा होणार आहे सकाळी ८ वाजता महा अभिषेक ११ वाजता वेदांत केसरी ह.भ.प.किसन महाराज माने यांचे प्रवचन दुपारी १२ वाजता श्री चा जन्मकाळ सोहळा होणार आहे.यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे.

 

 

यावेळी राजू गोपणे,शाहू कोळी,गुरुदत्त जगदाळे,संतोष जाधव,आप्पासो पुजारी,गजानन सावंत,पृथ्वीराज देसाई, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक सोहळा होणार आहे.तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा व धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
error: Content is protected !!