खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील जोल्ले ग्रुपकडून एकसंबा बिरदेव यात्रेनिमित्त
रविवारी मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान शिरोळ तालुक्यातील दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या काळं आणि वश्या या बैल जोडीनं अवघ्या १७ मिनिट ३ सेकंदात ८ कि.मी चे अंतर पार करत ११ लाख रुपयांच्या बक्षीसावर आपले नांव कोरले.यावेळी लाखो शर्यत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अटीतटीच्या शर्यती अनुभवयास मिळाल्या.गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत शौकिनामध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण केलेल्या जोल्ले ग्रुपच्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये विना लाठी काठी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या 17 मिनिटे 3 सेकंद मध्ये दानोळीच्या बंडा खिलारे यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर बाळू हजारे शिरूर यांच्या बैलजोडीने १७ मिनिट १० सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत ५ लाख, सचिन पाटील परिते तृतीय क्रमांकासह ३ लाख तर उमेश जाधव पळशी यांच्या बैलजोडीने चतुर्थ क्रमांक पटकावत २ लाखाचे बक्षीस पटकाविले.यावेळी आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, प.पू अभिनय महास्वामी, आमदार.शशिकला जोल्ले, हालशुगरचे व्हा चेअरमन पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आण्णासाहेब जोल्ले,जोल्ले ग्रुप यांच्या कार्याचा आढावा घेत शर्यत शौकिनासाठी भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील बैलगाडी शर्यतप्रेमींसाठी पर्वणी ठरली आहे.खा.आण्णासाहेब जोल्ले,निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, माजी आ. सुरेश हाळवणकर, रवी हंजी, हालशुगरचे चेअरमन एम पी पाटील, इचलकरंजीचे हिंदुराव शेळके, जयानंद जाधव,आप्पासाहेब जोल्ले,एकसंबा शर्यत कमिटीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडला. कर्नाटक – महाराष्ट्रातील विविध भागातून एकसंबा शर्यत मैदान पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने शर्यत शौकीन मलिकवाड माळावर उपस्थिती लावली होती.