शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व स्मारक समितीची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली.३१ जणांचा समावेश असलेली समिती वेगवेगळ्या स्तरावर काम करणार आहे.शिवाय पुतळ्याचे काम लवकरात लवकर होऊन ते पूर्ण व्हावे याकरता विविध विषयाच्या निवड समिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.शिवाय सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून पुतळा समितीमध्ये ज्याना काम करावयाचे आहे व आमच्याकडून नजरचुकीने नाव राहिले असेल तर त्या युवकांनी पुतळा समितीची संपर्क साधून या कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.या पत्रकार परिषदेला माजी सरपंच गजानन संकपाळ,दत्तचे संचालक दरगु गावडे,राहुल यादव, धनाजी चुडमुंगे,संजय शिंदे,विजय आरगे,बाळासो कोळी(दिवाण),दिगंबर सकट, बापूसाहेब गंगधर,आदी मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समिती पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष – पृथ्वीराजसिंह यादव खजिनदार – धनाजी चुडमुंगे सचिव – पांडुरंग उर्फ अविनाश माने सदस्य – माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव,दलितमित्र डॉ अशोकराव माने, दत्तचे संचालक दरगू गावडे,माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील – नरदेकर,माजी नगरसेवक प्रकाश गावडे,पंडित काळे,युवा नेतृत्व शरद उर्फ बापू मोरे,माजी सरपंच गजानन संकपाळ,प्रमोद उर्फ बाळासो लडगे,विजय वसंतराव आरगे,बी जी माने,रणजीतसिंह दिलीपराव पाटील,सचिन शिंदे,मुकुंद उर्फ बाळासो गावडे,बाळासो कांबळे,प्रवीण चुडमुंगे,रणजीत जयवंतराव जगदाळे, धनाजी शिवाजीराव जाधव,शक्तीजीत गुरव,रावसाहेब माने, सहसचिव – अमर माने,शुभम धनाजी माने,पिंटू उर्फ काशीम बाळासाहेब शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विविध समित्या निवडण्यात येणार आहेत.या समितीमध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तीची निवड करून कामकाज केले जाणार आहे.त्याही समित्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितले.