कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कवठेगुलंद आणि दत्तवाड येथे स्वतंत्र पोलीस चौकी (औटपोस्ट) सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शाहीर आवळे यांनी सपोनि रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे.27 गावांचा समावेश असून काही काही गावे संवेदनशील आहेत.
याठिकाणीं दारू जुगार मटका गांजा अशा अनेक अवैध व्यवसायाने डोकेवर काढले आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेवरून महाराष्ट्रात कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून गुटखा-चंदनसह आदी अवैध मालाची तस्करी होते.त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिक व्यासनाच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.
हे सर्व रोखण्यासाठी दत्तवाड आणि कवठेगुलंद हे दोन मध्यभाग असून या ठिकाणी औटपोस्ट होणे गरजेचे आहे या ठिकाणी दोन औटपोस्ट सुरू करावे असे म्हटले आहे.निवेदनावर दिनेश कांबळे, दिगंबर सकट,किरण कोळी आदींच्या सह्या आहेत.