चिंचवाड / प्रतिनिधी
येथील अवधूत संदिप पाटोळे हा चिंचवाडचा सुपुत्र व उत्कृष्ठ कबड्डी पटटू असून नुकतीच कोल्हापूर जिल्हा कुमार गटातून ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.तो शिरोळच्या बाल शिवाजी मंडळाचा कबड्डी पटटू असून सध्या तो कोल्हापूरच्या राव अॅकॅडमी मध्ये सराव करत आहे.त्याला प्रा.आण्णासो गावडे,प्रा.रमेश भेंडिगरे,प्रा.संभाजी पाटील,पी.आर.कळंत्रे सर तसेच आई – वडिलांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या निवडीबद्दल चिंचवाडसह कबड्डी प्रेमीतून त्याचे अभिनंदन होत आहे.