लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे हृदयविकाराने निधन

हातकणंगले शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वा. त्यांच्या घरी हृदयविकाराने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले.डिसेंबर २०१९ च्या पहिल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पहले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाल होता.त्यापूर्वीच त्यांची मनाला चटका लावणारी एक्झिट (मूत्यू) झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. ते माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार राजू बाबा आवळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.२०१९ च्या नगरपंचायत निवडणूकीत ते एकमेव कॉग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार होते. १७ नगरसेवकामध्ये भाजपा, शिवसेना, अपक्षांना ते गेली चार वर्ष समान न्याय देवून शहाराच्या विकासासाठी धडपड करत होते.त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
error: Content is protected !!