मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास जयसिंगपूर ११ वी गल्ली येथील बाबुराव धनवडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा जयसिंगपूर व लगत दुकानास लागलेल्या भीषण आगीत 6 दुकाने जळून खाक झाले आहेत घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी 2 तासाच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली लागली. याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 11 येथे मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानाला आग लागली या आगीमुळे शेजारी असणाऱ्या इतर अकरा दुकानं ही यादी भस्मस्थानी पडले आहेत परिसरातील नागरिकांना माहिती कळताच त्यांनी पालिका व संबंधित दुकान मालकांना कळवले नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट करू शकले नाही तर दत्त साखर शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका,जयसिंगपूर नगरपालिका, इचलकरंजी महापालिका,घोडावत ग्रुप यांच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुमारे तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली,या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
