एस टी महामंडळ सेवानिवृत्ती निमित्त संजय पाटील यांचा राष्ट्रसेवा संघटनेतर्फे भव्य सत्कार संपन्न

एस टी महामंडळ सेवानिवृत्ती निमित्त संजय पाटील यांचा राष्ट्रसेवा संघटनेतर्फे भव्य सत्कार संपन्न

शिरोली पुलाची – प्रतिनिधी -कुबेर हंकारे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळाच्या प्रदीर्घ अशा 34 वर्षाच्या सेवेतुन निवृत्त झालेबद्दल राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष आणि शिरोली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय सीताराम पाटील यांचा राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीने रुक्मिणी मल्टिपर्पज हॉल येथे दिमाखदार सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला..
संजय सिताराम पाटील  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारांमध्ये वाहतूक नियंत्रण निरीक्षक या पदावर ते १९८९ साली रुजू झाले त्यानंतर काही वर्षातच त्यांना बढती अर्थात प्रमोशन मिळाले.परंतु संजय पाटील यांना असणारी समाजकार्याची आवड तसेच शिरोली विकास सेवा संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी आणि गावातील लक्षवेधी अशा राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी नोकरी मधील प्रमोशन नाकारून इंचलकरंजी  आगार मध्येच आपल्या उर्वरित सेवेचा पूर्ण काळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने हे होते.खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संजय पाटील यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.खासदार धैर्यशील माने म्हणाले
 राष्ट्रसेवा संघटनेच्या नावातच राष्ट्र अधिक सेवा असल्याने संजय पाटील यांचे अध्यक्ष म्हणून असणारे कार्य हे त्या नावाला साजेसे आहे.. अशी संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील पहिलीच संघटना असावी. सुसंस्कारी युवक घडवणारी,त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी,सजीव देखाव्यातुन सामाजिक प्रबोधन करणारी, सदस्यांच्या सुख – दुःखात नेहमी त्यांच्या सोबत असणारी अशी ही पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा संघटना आहे.. तसेच संजय सीताराम पाटील ज्यांच्या वडिलांच्या नावातच सीता आणि राम सामावलेले आहेत तर त्यांनी दिलेले संस्कार हे राष्ट्रहिताचेच असणारे आहेत आणि हेच संस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात उपयोगी पडत आहेत..त्यांनी जरी सेवा परिवहन महामंडळाची केली असली तरी आपल्या सर्वांची त्यानी अप्रत्यक्ष सेवा केली आहे.. त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी असेच पुढे अविरत चालू ठेवावे,अशा शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.
राजाराम कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक याप्रसंगी म्हणाले संजय पाटील आज सरकारी सेवेतुन निवृत्त झाले असले तरी इथून पुढं त्त्यांची सामाजिक कामाची जबाबदारी वाढली आहे.त्यांनी केलेल्या प्रदीर्घ अशा सेवेमुळेच आज इचलकरंजी एस टी डेपो पुर्णपणे प्रॉफिट मध्ये आहे.आज या सोहळ्याला जमलेली ही माणसं संजय पाटील यांच्या कामाची पोचपावती आहे.तसेच नोकरी करत राष्ट्रसेवा युवक संघटनेसारखं मोठं मंडळ उभं करणं, हेदेखील निश्चितपणे प्रशंसनीय असं काम आहे.आमच्या सदिच्छा भविष्यात तुमच्या सोबत असतील.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत आणि सूत्रसंचालन अजित देशपांडे यांनी केले.
यावेळी सुजित पाटील,विनायक पाटील,तात्यासो पाटील,वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी पदवीधर आमदार अरुण लाड ,माजी आमदार अमल महाडिक, मुंबई हाय कोर्टचे वकील प्रकाश लाड,आर एस पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर,शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे,छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील,वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील,शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी,वित्त व लेखा अधिकारी मिलिंद पाटील,जेष्ठ उद्योजक तुकाराम पाटील,शिरोली वि.का.स सेवा संस्थेचे चेअरमन धनाजी पाटील,बाबासो कांबळे , विश्वास गावडे,जगन्नाथ पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीने संजय पाटील यांना मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रसेवा संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसेवा युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आदींनी कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले.
Spread the love
error: Content is protected !!