दुर्वा (हराळी )
दुर्वा याला ग्रामीण भागात “हराळी ” या नावाने ओळखतात. याचे महत्व आयुर्वेदिक तसेच आध्यत्मिक खूप जुने आहे.
दुर्वा Botanical Name -(Cynodon dactylon)
रस -मधुर
वीर्य -शित
विपाक -मधुर
कर्म -पित्त व कफ नाशक.
दुर्वा हे प्रकारचे गवत शित गुणाचे असून विविध आजारावर उपयुक्त आहे.अंतर्गत /पोटातून कोणत्या आजारावर उपयुक्त आहे
1) कडकी /उष्णता
2) जठाराला चट्टे पडणे (gastritis )
3) डोळ्याची सूज, डोळे लाल होणे, चूरचूरणे
5) मूळव्याध /संडासची जागा भगभगणे
6) रक्तस्त्राव
7) त्वचारोग
8) नागीण
9) चेहऱ्यावर फोड उठणे
10) करट
11) नाकातील गुन्ना फुटणे (नाकातून रक्त येणे )
12) सतत गर्भपात होणे
13) सतत तोंड येणे (Apthous Ulcer )
14) फिट्स येणे
वरील सर्व विकारांवर ताजा दुर्वा रस किमान 20ml /1 वाटीभर घ्यावा. याने आपल्या प्रकुतीत निश्चित फरक दिसून येईल.
बाह्य उपचारासाठी –
1) अल्सर व न बऱ्या होणाऱ्या जखमा यामध्ये याची पेस्ट करून लावल्यास अल्सर / जखम लवकर भरून येते
2) दुर्वाचा रसाचे 2 थेंब नाकात घातल्यास डोळे व डोक्याला शीतलता प्रधान करते, उन्हात जाऊन आल्यावर डोके दुखत असल्यास दोन्ही नाकपुड्यात 2-2 थेंब दुर्वा रस टाकल्याने डोकेदुखी त्वरित थांबते.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340