ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील संभाजी दत्तू बाटे एज्युकेशन सोसायटीचे ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शिवानी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला.या स्नेहसंमेलनामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई लहान लहान चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गीते झाशीची राणी,दमलेला बाबा,श्रीरामंची थीम,लेझीम,लाठी काठी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतिक नृत्य या चिमुकल्याणी सादर केली २०१७ साली या स्कूलची सुरुवात झाली गेली सहा वर्ष ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती शालन संभाजी बाटे या होत्या प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे,प्रिन्सिपल सौ. मनीषा बाटे,माजी आमदार डॉ.सुजित मिंणचेकर,

माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, बाजीराव सातपुते,माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण,अनिल खवरे,राजकुमार पाटील, सतीश रेडेकर मुकुंद नाळे,पत्रकार राजू पाटील, पत्रकार गणपती लुगडे,संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक संतोष बाटे यांनी केले दीपप्रज्वलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शालन बाटे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.प्रास्ताविक सीमा लोखंडे यांनी केले

सर्वप्रथम या चिमुकल्याने गणेश वंदना सादर केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गीते सादर केली तसेच झाशीची राणी, लेझीम मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक कराटे प्रात्यक्षिके तसेच श्रीरामांची थीम , ट्विंकल स्टार स्कूलच्या चिमुकल्यांनी दमलेला बाबा ही थीम सादर करत असताना उपस्थितांची मने जिंकली पण उत्तम साजरीकरणामुळे उपस्थितच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचे पहावयास मिळाले अशा सुंदर रित्या सादरीकरण या चिमुकल्याणी केले.दरवर्षीप्रमाणे बेस्ट स्टुडंट गर्ल तनिष्का बेस्ट स्टुडन्ट बॉय स्वराज पुजारी बेस्ट टीचर अवॉर्ड प्रतीक्षा पाटील यांना मिळाला या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे ,सौ.मनीषा बाटे यांनी केले.संमेलनाचे सूत्रसंचालन सीमा लोखंडे यांनी केले प्रतीक्षा पाटील पुनम बागी सारिका काळे स्नेहल कोरे कविता ढेंबरे प्राजक्ता पाटील या सर्वांचे सहकार्य लाभले.
Spread the love
error: Content is protected !!