पार पडला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मयुर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवि चंद्रशेखर डोली सर आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचे अध्यक्ष साहिल मणियार सर हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे तज्ञ संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मनोजकुमार पाटील साहेब यांनी केले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री वाकरेकर सर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एस एन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ चा डोलारा कसा उभा राहात गेला याची माहिती आणि 26 जानेवारी विषयी थोडक्यात माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यां चे कवायत संचलन,डोळ्याचे पारणे फेडणारा व आदर्श संदेश देणारा मनोरा, देशभक्तीपर गीत नृत्य व गायन मुलांची भाषणे हे पार पडले.श्री रवी चंद्रशेखर डोली साहेब यांनी आपल्या मनोगतात शाळेची प्रगती सुंदर सुरू आहे माझ्याकडून अनेक शुभेच्छा असे म्हणत विद्यार्थ्यांसहित शिक्षकांच्या ही टाळ्या मिळवल्या.तसेच मनियार साहेबांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आम्ही आपल्या सोबतच आहोत अशी ग्वाही दिली.सदर कार्यक्रमासाठी शिरोली गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. पद्मजा करपे वहिनी ,जितेंद्र बामणे सर तसेच भागातील सर्व नागरिक पालक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.अखेरीस श्री के आर जाधव सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरव सर,श्री कांबळे सर व श्री पाटील सर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ प्रतिभा पाटील मॅडम व सौ एस जी पाटील मॅडम यांनी केले त्यांना सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा संस्थेचे संस्थापक माननीय श्री एस एन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अखेरीस मुलांना खाऊ वाटप करून वंदे मातरम राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.