क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.यावेळी आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर,राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यंत्रअभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अभियंता मनोज लिंग्रस व आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
