मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच समाजाला न्याय मिळाला – दरगू गावडे
मराठा आरक्षण लढ्यास यश शिरोळात जल्लोष
शिरोळ / प्रतिनिधी
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी लढा दिला मराठा समाज बांधव ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले कोणत्याही आमिषाला बळी न पडता आंदोलनात कोणतेही तडजोड न करता केवळ मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या लढ्यामुळेच मराठा समाज बांधवांना न्याय मिळाला असे मत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजास आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांकरिता लढा सुरू करण्यात आला होता वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन तीव्र केले या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्रित आला होता आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन शुक्रवारी रात्री मराठा समाजास आरक्षण देण्याबरोबरच मराठा समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य केल्या त्या संदर्भात तात्काळ शासनाने अध्यादेशही काढला शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले व आरक्षणासंदर्भात असलेला लढा मागे घेतला यामुळे संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला
शिरोळ येथील शिवाजी चौकात मराठा समाज बांधव एकत्र येऊन गुलालाची उधळण फटाक्याची आतिषबाजी साखर व पेढे वाटून मराठा समाजास आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा केला मराठा समाज बांधवांनी येथील छत्रपती शिवाजी तक्तमधील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महाराणी ताराराणी छत्रपती राजाराम महाराज यांच्या गादीचे दर्शन घेतले एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मोटरसायकल रॅली काढली
यावेळी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव बजरंग काळे माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे रणजीतसिंह पाटील अमरसिंह माने रामदास गावडे बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर किसन भाट रावसाहेब माने धीरज शिंदे उमेश माने विनोद मुळीक अक्षय ऊर्फ रविराज जगदाळे अर्जुन जाधव चंद्रकांत भाट प्रकाश माने ओंकार माने गावडे प्रसाद संकपाळ दिलीप उर्फ बंडू गावडे दिलीप गाडगीळ अभिजीत मोरे विजय चव्हाण दिग्विजय माने गजानन कोळी सचिन माने विजय गंगधर प्रसाद कदम दत्तात्रय पुजारी महादेव बाबर महेश जाधव यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते