आजच्या धावत्या युगात बॉडी फिटनेस राखणे फार महत्वाचे आहे कारण “फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन “आणि बॉडी फिट राहायची असेल तर सूर्यनमस्कार आलेच पाहिजेत.
सूर्यनमस्काराचे फायदे –
1) पाचनशक्ती सुधारते.
2) बॉडी शेप प्रॉपर राहतो
3) शरीर शुद्धी होते.
4) पोट व वजन कमी होते.
5) शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते.
6) मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.
7) चेहरा व त्वचेच्या समस्या दूर होतात.
8) रक्ताभिसरन क्रिया चांगली होते.
9) ईम्म्युनिटी चांगली राहते.
10) उंची वाढते.
सूर्य नमस्कार कोणी घालू नये –
1) गर्भवती स्त्रिया
2) हर्निया असलेल्या व्यक्ती.
3) नुकताच पोटाचे ऑपरेशन झालेल्या व्यक्ती
4) ओस्टिओपेनिया(ज्यांची हाडे सतत फ्रॅक्चर होतात) या आजाराने ग्रसित व्यक्ती
सूर्य नमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स वेळी सूर्याचा स्पेशल असा मंत्र दिला आहे तो उच्चारत सूर्यनमस्कार घातल्यास अधिक प्रभावशाली रिसल्ट्स मिळतात.
सूर्यनमस्काराच्या एकूण 12 स्टेप्स आहेत आणि प्रत्येक स्टेप्सचे विशेष महत्व देखील आहे.
स्टेप्स –
1) प्रणामासन (ॐ मित्राय नमः )
2) हस्त उत्तनासन(ॐ रवये नमः )
3) पादहस्तासन (ॐ सूर्याय नमः )
4) अश्वसंचलानासन (ॐ भानवे नमः )
5) दंडासन (ॐ खगय नमः )
6) अष्टांग नमस्कार (ॐ पुष्णे नमः )
7) भुजंगासन (ॐ हिरण्यगर्भाय नमः)
8) पर्वतासन (ॐ मारीचाये नमः )
9) अश्व संचलानासन (ॐ आदित्याय नमः )
10) हस्तपादासन (ॐ सावित्रे नमः )
11) हस्त उत्तनासन (ॐ अर्काय नमः )
12) ताडासन (ॐ भास्कराय नमः )
ज्याला स्वस्थ राहायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तींनी किमान 11सूर्यनमस्कार दररोज न चुकता घालावेत
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340