चांगली कामे करणाऱ्यांच्या पाठिशी जनता उभी राहते – पालकमंत्री मुश्रीफ

कुरुंदवाड / प्रतिनिधी

बहुजन समाजाचा विश्वास प्राप्त करून जनतेने दिलेल्या संधीची खास.धैर्यशील माने,आम.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी चांगली कामे करत उतराई केली आहे. जनता नेहमी चांगली कामे करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहते.लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही जोडी पुन्हा फिट्ट असल्याचा माझा दावा असून दोघेही माझ्यासोबत असतील असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण आणि मुस्लिम समाज संस्कृतीक हॉलच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.अध्यक्षस्थानी आम.डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर,खास धैर्यशील माने,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,रावसाहेब पाटील, जवाहर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसर सुशोभीकरणाचे पायाभरणी व मुस्लिम संस्कृतीक हॉलचे ईदगाह येथे पायाभरणी शुभारंभ करण्यात आला.यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले शहरातील शिवतीर्थ सुशोभीकरण,मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल आणि लिंगायत समाजा बहुउद्देशीय हॉलच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला शहराच्या विकासासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून आणखीन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले शहराला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी येत्या 6 महिन्यात 45 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेच्या कामाला आरंभ होईल. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि समाजभवन उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची पालकमंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून तरतूद करून 6 महिन्यात कामाला सुरवात करणार असल्याचे सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष फारूक जमादार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख(शिंदे गट) सतीश मलमे,माजी नगरसेवक अक्षय आलासे,दीपक गायकवाड, इकबाल बैरागदार,प्रा.चंद्रकांत मोरे,अभिजित जगदाळे, अजित देसाई,जय कडाळे,सुनील कुरुंदवाडे,शिवतीर्थ समितीचे अमृत चोपडे, मुस्लिम सुन्नत जमाअतचे मिरासो पाथरवट व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!