बोरगाव येथे 108 शांतीसागर को-ऑप.क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ – चेअरमन शरदराव जंगटे यांची माहिती

बोरगाव येथे 108 शांतीसागर को-ऑप.क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ – चेअरमन शरदराव जंगटे यांची माहिती

बोरगाव / प्रतिनिधी

बोरगाव व पंचक्रोशीतील शेतकरी व कष्टकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शिवाय व्यवसायिक व नोकरदार यांच्या हित दृष्टिकोनातून हालशुगर संचालक,बोरगाव विद्यमान नगरसेवक व संस्थेचे संस्थापक शरदराव जंगटे यांच्या पुढाकाराने नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी खास.अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्ले दांपत्यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केले आहे.आचार्य रत्न श्री 108 कुलरत्न भूषण महाराज व परमपूज्य संपादना महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित या उद्घाटन समारंभासाठी भागातील विविध संस्थेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या उदघाटण सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कमिटीने केले आहे.आपण उद्योजक,व्यापारी,नोकरदार यांच्या ठेविस विश्वसनीय संस्था उभी करावी,त्याच बरोबर कष्टकरी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या सहकार्याने श्री 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीची नव्यानेच स्थापना करत असून आपण सर्वांनी या संस्थेच्या उद्धारासाठी सहकार्य करण्याची विनंती संस्थेचे संस्थापक शरदराव जंगटे यांनी केली आहे.आयोजित पत्रकार बैठकीस संस्थेचे संस्थापक चेअरमन शरदराव जंगटे,उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ, शितल आम्मनवर,धवल भिवरे,प्रकाश पाटील,अक्षय चौगुले,सुनील गोरवाडे,भूपाल महाजन,अर्जुन हुडेद,सौ भारती सातपुते,सौ पद्मश्री पाटील, यांच्यासह संस्थेचे प्रधान व्यवस्थापक निलेश पाटील उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!