शिरोळ / प्रतिनिधी
आयोध्या येथील श्री राम मंदिरात होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने शिरोळ मधील माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी आपल्या प्रभागातील घरोघरी श्री रामाची प्रतिमा व अक्षताचे वाटप केले आहे.सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या नवीन श्रीराम मंदिरातील तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.यामुळे देशात सर्वत्र या दिवशी श्रीराम जन्मोत्सव सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे यासाठी घरोघरी श्रीराम प्रतिमेचे व अक्षताचे वाटप करण्यात येत आहे.शिरोळचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ.अरविंद माने व जायटंस् ग्रुप ऑफ शिरोळ सहेलीच्या अध्यक्षा सौ. सारिका अरविंद माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत प्रभाग क्रमांक २ मधील घरोघरी जाऊन श्रीरामाची प्रतिमा व अक्षताचे वाटप केले.
यावेळी बोलताना डॉ अरविंद माने म्हणाले की सोमवारी आयोध्या येथील श्री राम मंदिरातील तळमजल्यात होणारा रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभले आहे.यामुळे हा दिवस श्री राम जन्मोत्सव दिवस म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन धार्मिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.श्रीराम प्रतिमा व अक्षता वाटप प्रसंगी समयनय माने श्रेणिक माने राघव सुतार ऋषिकेश माने(सोन्या)दगडू जाधव,भाग्योदय ढवळे,राहुल माने,समर्थ माने,श्रीशैल्य माळी,शिवतेज चुडमुंगे, यश खाडे,संकेत माने,दीपक माने, आर्यन माने,सतीश राजमाने,महेश माने,रोहन माने,सुयोग लाटे,रुपेश माने,वेदांत माने,कृष्णा माने,ऋषिकेश माने, शिवराज माने, राहुल कुराडे,समर्जीत माने, निखिल माने, आकाश देवकारे,संग्राम माने,आदर्श माने,आदित्य माने, राहुल कुराडे,सोनू माने,विनायक माने,ओमकार माने, सुशील पाटील,प्रशांत देवकारे,दादासो आवळे,प्रकाश आवळे,प्रदीप भोसले,प्रवीण कोळी,तुषार कोळी,
सागर काळे,भरत माने यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.