सदलगा / प्रतिनिधी
सदलगा येथील दि बाळकृष्ण विविध उद्देशीय सहकारी संघाच्या वतीने आयोजित किसान महोत्सव 2024 मोठ्या दिमाखात संपन्न झाला.किसान महोसत्त्वाचा शुभारंभ परमपूज्य ईशप्रसाद महास्वामीजी गुरुदेव आश्रम अथरगा (ता.इंडी) डॉ श्रद्धानंद स्वामीजी गीता आश्रम सदलगा,परमपूज्य शिवप्रसाद महास्वामीजी गुरुदेव आश्रम हिरेपडसलगी (ता.जमखंडी), ह.भ.प. धोंडीराम मगदूम महाराज (ता.करवीर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.तदनंतर सुवासिनी महिलांच्या हस्ते देशी गाईंचे पूजन करण्यात आले. स्वामींच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करण्यात आले.नंतर संस्थेचे अध्यक्ष महादेव मधाळे यांचा 52 वा वाढदिवसानिमित्त व किसान महोत्सवाचा केक कापून महोत्सवाला शुभारंभ करण्यात आला.ह.भ.प. मगदूम महाराज यांच्या गोमाता गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.संस्थेचे अध्यक्ष महादेव मधाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.याप्रसंगी बोलताना डॉ.श्रद्धानंद स्वामीजी यांनी खिलार गाईंचे स्पर्धा आणि प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम आहे.स्पर्धेच्या माध्यमातून देशी गाय संगोपनाला प्राधान्य देण्याच्या माध्यमातून बालकृष्ण सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.हा उपक्रम वर्षानुवर्षे असाच सुरू राहावा. संस्थेने स्वतःचे सभाभवन बांधावे.संस्थेच्या अनेक शाखा निघाव्यात.बाळकृष्णरुपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे अशी सदिच्छा आशीर्वाद दिले.परमपूज्य ईशप्रसाद महास्वामीजी यांनी बाळकृष्ण सोसायटीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची जोपासना होत आहे. गोमाता हे खरे धन आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे असे सांगितले.याप्रसंगी परमपूज्य शिवप्रसाद महास्वामीजी यांनीही आशीर्वचपर मार्गदर्शन केले.किसान महोत्सवानिमित्त आयोजित जनरल खिलार गाय स्पर्धेत संजय टाकळी राहणार फुटाणवाडी यांनी प्रथम, विनोद माने हुपरी यांनी द्वितीय, संभाजी पठाडे भीमापूरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5001, 3001, 2001 रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन स्वामीजींच्या हस्ते गौरविण्यात आले.
बिनदाती खिलार गाय स्पर्धेत समीर पाटील सांगाव, गुरुप्रसाद पवार नरसिंहवाडी, नितीन माने सावळी या स्पर्धकांच्या गाईने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 2501, 2001, 1501 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस साई सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले.परिक्षक म्हणून डॉ.ए. पी.कोटगरी,कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कुमार वंदुरे, संचालक हुवन्ना केशे, गोपाल मिरजकर, शिवबोध चौगुले, बसवराज हणबर, राजू हंचनाळे, संजय अवघडी, सुरज मधाळे, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील, पद्मजा हंणबर, रिहाना मुजावर, मोहन कांबळे यांच्यासह सभासद,शेतकरी, हितचिंतक व गोप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर मोडके यांनी केले. व्यवस्थापक रामचंद्र रामकट्टी यांनी आभार मानले.