दानोळी केंद्रांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा विषयी मुख्याध्यापक कार्यशाळ संपन्न

दानोळी केंद्रांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा विषयी मुख्याध्यापक कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

दानोळी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा कार्यशाळा आदर्श विद्यालय कोथळी येथे दानोळी केंद्रातील मुख्याध्यापकांची माझी शाळा,सुंदर शाळा या विषयांवरील दुसरी कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेत अभियानाची व्याप्ती व अंमलबजावणी याबाबत केंद्रीय प्रमुख दत्तात्रय जाधवर यांनी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानाची माहिती दिली.अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे १३ मुख्याध्यापक व तंत्र स्नेही शिक्षक तर खाजगी शाळेचे ५ मुख्याध्यापक उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी आदर्श विद्यालय कोथळी चे सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!