कुरुंदवाडमध्ये कुमार विद्या मंदिर नं.3 जि प शाळेच्या चिमुकल्यानी भरविला बाजार
कुरुंदवाड / प्रतिनिधी
शालेय उपक्रमाअंतर्गत येथील कुमार विद्यामंदिर नं 3 शाळेतील चिमुकल्या मुलांनी मकर संक्रांत आणि भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर काल भरविलेल्या बाजारात मोठी उलाढाल झाली.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्यात व्यवहार आणि व्यवसाय वृद्धीची संकल्पना रुजावी म्हणून येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर नंबर तीनचे मुख्याध्यापक रवी कुमार पाटील,किरण माने, कृष्णात आंबी आदींच्या संकल्पनेतून येथील शाळेच्या मैदानात मकर संक्रांति
आणि भोगीच्या पार्श्वभूमी चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून बाजार भरविण्यात आला होता. विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, खेळणी, आणि चटपटीत खाद्यपदार्थाच्या विविध स्टॉलने हा बाजार गजबजला होता. सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत भरलेल्या बाजारात विद्यार्थ्यासह पालकांनी उपस्थित
राहून भोगी आणि मकर संक्रांति साठी लागणाऱ्या साहित्यांची मोठी खरेदी केली. सणाच्या या खरेदीसाठी ग्राहक वर्गातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा बाजार गजबजला होता. या बाजारासाठी हनुमंत पडुळकर, प्रकाश पुजारी, विकास लाटकर, शंकर दिवटे,
सौ रागिणी पाटील, सौ स्मिता फल्ले, सौ सुवर्णा भोई, सौ रितू पाटील, सौ संपदा पाटील, सौ सावित्री नवाळे, सौ रुपाली वाघमोडे, सौ तेजा शिरोळकर, सौ रंजना माने सौ हेगडे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले होते.