शिरोळ तालुक्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटीचा निधी – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ तालुक्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटीचा निधी – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / प्रतिनिधी
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2023-24 सालाकरीता शिरोळ तालुक्यासाठी 2 कोटी रुपयेचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लमाण,बंजारा,वंजारी,धनगर,रामोशी,पारधी या प्रवर्गातील अनेक जाती जमातीतील वस्तीमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी यात दानोळी येथे रस्ता व गटर्स करणे 10 लाख,नवे दानवाड येथे रस्ते व गटर्स करणे-10 लाख, कोथळी रस्ते,गटर्स करणे 05 लाख, टाकळीवाडी येथे रस्ते, गटर्स करणे-10 लाख, घोसरवाड येथे रस्ते, गटर्स करणे 10 लाख,यड्राव येथे रस्ते व गटर्स, करणे 10 लाख,नांदणी येथे रस्ते व गटर्स करणे 20 लाख.अर्जुनवाड येथे रस्ते व गटर्स करणे 20 लाख, गणेशवाडी येथे सभागृह, रस्ते व गटर्स करणे 10 लाख, चिंचवाड येथे सभागृह व रस्ता व गटर्स करणे- 20 लाख,जुने दानवाड येथे रस्ता व गटर्स करणे- 3 लाख, कवठेगुलंद येथे रस्ता व गटर्स करणे 7 लाख,शेडशाळ रस्ता व गटर्स करणे-10 लाख,आलास येथे सभागृह, रस्ते व गटर्स करणे 20 लाख,हरोली रस्ता व गटर्स करणे-10 लाख असे एकुण 2 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.
Spread the love
error: Content is protected !!