महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्यानंतर अमृता पुजारी हिचे शिरोळ निवासस्थानी प्रथमच आगमन
शिरोळ येथे परिवाराच्या वतीने पुष्पवृष्टी, औक्षण करून जल्लोषी स्वागत ; कुटुंबीयांसह धनगर समाजात आनंदोत्सव
शिरोळ / प्रतिनिधी
चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत शिरोळ येथील पैलवान कु अमृता शशिकांत पुजारी हि महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्यानंतर प्रथमच शुक्रवारी शिरोळ आपल्या निवासस्थानी आली.मुरगुड येथील कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे घेत आणि कुस्ती स्पर्धेतील यशानंतर कु अमृता हिचे दोन महिन्यांनी घरी आगमन होताच पुजारी कुटुंबीय आनंदून गेले. येथील धनगर समाज बांधव तसेच परिवाराच्या आनंदाला उधाण आले होते.दरम्यान वडील शशीकांत पुजारी व परिवाराच्या वतीने पैलवान अमृता पुजारी व कुस्ती प्रशिक्षक पै दादासो लवटे यांच्यावर पुष्पवृष्टी करून महिलानी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आजोबा पैलवान देवाप्पा पुजारी व बबन पुजारी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लोकनेते सदाशिव मंडलिक कुस्ती आखाड्याचे
कुस्ती प्रशिक्षक पै दादासो लवटे, पै देवाप्पा पुजारी , पै अस्मिता पाटील ,बबन पुजारी , शशिकांत पुजारी ,मोहन पुजारी , माणिक पुजारी ,सुरज पुजारी , डॉ दगडू माने,
आप्पासो पुजारी , बजरंग पुजारी यांच्यासह धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते.दरम्यान शिरोळ नगरपरिषद व शहरवासिय यांच्या वतीने पै अमृता हिला मानपत्र , चांदीची गदा व आरोग्य विमा पॉलिसी देवून लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शिरोळमधील लोकप्रतिनिधी, सेवा संस्थांचे पदाधिकारी ,तरुण मंडळे , शाळा प्रतिनिधी , कुस्तीगीर परिषदचे पदाधिकारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या समिती स्थापन करून लवकरच हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.