उतार वयात लघवी साफ न होता,थेंब थेंब होते, लघवी करून आलं तरी समाधान होत नाही, लघवी करताना वेदना होतात त्यालाच प्रोस्टेट ग्रंथी चा त्रास सुरु झाला आहे हे ओळखावे.येथे अपान वात व कफाची दुष्टी होते.
लक्षणे –
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे, लघवी करताना कुंथावे लागणे, लघवी करताना दुखणे, लघवी तुंबून राहणे,सारखं सारखं लघवी आल्यासारखं होणे हि सर्व लक्षणे साधारणता: आढळतात.
तपासणी –USG Abdomen(पोटाची सोनोग्राफी )
अपथ्य (काय खाऊ नये )-
वात व कफवर्धक आहार, हरभरा, पावटा, वरणा, दुधाचे जड पदार्थ, गोड पदार्थ, नॉनव्हेज, कॉफी, दारू, उडीद, पापड, लोणचे, गव्हाचे अन्न, पालक, तंबाखू, अति मसालेदार -तेलकट पदार्थ, दही,मोहरी, तिळ, कोल्ड्रिंक, तूप, लोणी,थंड पाणी.
पथ्य (खावे )-
मूग डाळ, लाल भात, कुळीथ, लसूण, सुंठ, ताक, तोंडली, शेवगा, दुधूभोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, कलिंगड, जिरे, धने, कोथिंबीर, घेवडा, भेंडी, गवारी, कोबी, फ्लॉवर, कोमट पाणी.
आयुर्वेदिक उपचार –
निरुह बस्ती, सहचादी तेलाची उत्तर बस्ती.
आयुर्वेदिक औषधी –
गोक्षुरादी गुग्गुळ, वरुनादी काढा, वंगशील.
उपाय –
1) दररोज पोट साफ होण्यासाठी 1तांब्याभर गरम पाणी पिणे, त्यावर 1तास काहीही खाऊ नये.
2) हरितकी, गोक्षुर, पुनर्नवा, वरुण, श्वेत पर्पटी, सज्जी क्षार, यव क्षार एकत्रित चूर्ण करून गरम पाण्यातून दिवसातून 2वेळा घ्यावे.
3) बेंबीखाली ओटी पोटात मोहरी तेल गरम करून, मालिश करावी व काळ्या वाळूची पूरचुंडी बांधून त्याचा शेक घ्यावा.
4) फॅन /AC चा वापर टाळावा.
5) थंडीपासून काळजी घ्यावी व कोमट पाण्याचे सेवन करावे.
6) आठवड्यातून 2वेळा स्टीम बाथ घ्यावा.
7) ॲक्युप्रेशर चा उपयोग करून घ्यावा.
8) पोट साफ होण्यासाठी व वाताचा अनुबंध कमी होण्यासाठी 1चमचा एरेंडेल तेल सकाळी व रात्री जेवणाअगोदर घ्यावे.
9) गोमुखासन,कपालभाती,सुप्तपादागुष्टासन, सिद्धासन,धनुरासन, वीरासन,विपरीत करणी आसन हे योगाभ्यास नियमितपणे करावेत. 10) रात्री जेवल्यानंतर अल्प जल प्यावे( रात्री झोप मोड होणार नाही) 11) रात्री जेवण व झोप यामध्ये किमान 2 तासाचे अंतर असावे
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340