हसूर व दत्तनगर केंद्रातील मुख्याध्यापकांची “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” कार्यशाळा संपन्न

दत्तनगर / प्रतिनिधी

शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी ठीक सकाळी अकरा वाजता केंद्र शाळा दत्तनगर येथे केंद्र दत्तनगर व केंद्र हसूर केंद्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.सदर सभेस अण्णा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय याचे विस्तृत वाचन केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांनी केले.सदर उपक्रम आणि त्याची माहिती विस्तृतपणे सर्व मुख्याध्यापकांना विशद केली समजावून सांगितली. त्याचबरोबर ४५ दिवसाचा कार्यक्रम कसा आहे? केंद्र दत्तनगर व केंद्र हसूर मधून उत्तम प्रकारे कसा राबवला पाहिजे.या गोष्टीचे महत्त्व सुद्धा पटवून दिले. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या दूरभाष्य माध्यम संवादातील मुद्देही मुख्याध्यापकांना समजावून सांगितले आजची बैठक पार पडली.सदर सभेस शरद सुतार केंद्र समन्वयक उपस्थित होते.तसेच केंद्रातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळातील हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!