बोरगाव येथे १४ जानेवारीला विराट शर्यतीचे आयोजन – आण्णासाहेब हवले यांची माहिती

बोरगाव येथे १४ जानेवारीला विराट शर्यतीचे आयोजन : आण्णासाहेब हवले यांची माहिती

बोरगांव/ प्रतिनिधी

बोरगाव ता.निपाणी येथे बोरगाव परिसरातील जनतेच्या व शर्यती शौकिनांसाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने व नागरिक संघटनेच्या वतीने रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी खास मकर संक्रातीनिमित्त विना लाठी काठी, विना मोटार सायकल भव्य विराट शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब हवले यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली.

 

आयोजित शर्यतीबद्दल माहिती सांगताना आण्णासाहेब हवले म्हणाले की बोरगाव परिसरातील जनतेला व शेतकरी वर्गाला विविध मनोरंजनाचा लाभ घेता यावा यासाठी कै.बाबुराव मगदूम व कै.जंबुराव चीप्रे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटनेची 1978 ला स्थापना करण्यात आली.व पुढे याच संघटनेमार्फत नवीन वर्षातील

 

मकर संक्रात हा पहिला सण असल्याने या दिवशी सर्वांना शर्यतीचा आनंद मिळावा या उद्देशाने 1979 पासून विविध शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ लागले.मात्र काही काळानंतर बाबुराव मगदूम व जंबुराव चिप्रे यांचे निधन झाले.तेंव्हा पासून आजतागायत प्रतिवर्षी त्यांच्या स्मरणार्थ व शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी या शर्यती निरंतर पणे घेण्यात येत असून या शर्यतीचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन नियोजन कमिटी कडून करण्यात येत आहे.

 

मध्यंतरीच्या काळात शर्यती बंदी असल्याने खंड पडलेल्या या नियोजनात मात्र आता सुप्रीम कोर्टाने शर्यतीना परवानगी दिल्याने सर्वत्र शर्यती आयोजित करण्यात येऊ लागल्याने आम्हीही चालू वर्षी शर्यती प्रेमिंच्या आग्रहाखातर दिंनक १४ रोजी म्हणजे मकर संक्रांती दिवशी दुपारी ३ वाजता विविध शर्यतीचे आयोजन केले आहे.

 

या नागरिक संघटनेच्या वतीने स्थापने पासून आजतागायत केवळ शर्यतीचे आयोजन न करता सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यासाठी निबंध,रांगोळी स्पर्धा,विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करत आलो आहोत.यासाठी आम्हाला माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश हुक्केरी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते.म्हणूनच आम्हाला हे सर्व साध्य झाल्याचे सांगितले.

 

तर दिनांक १४ रोजी होत असलेल्या या विराट शर्यतीसाठी अ गट जनरल दुबैल बैलगाडी शर्यती साठी प्रथम ५१,००० रू.द्वितीय ३१,००० रू.,तृतीय २१,००० रू. ,ब गट जनरल दुबैल बैलगाडी शर्यती साठी प्रथम २५००१ रू.,द्वितीय १५००१ रू.,तृतीय १०००१ रू. , एक घोडा एक बैलगाडी शर्यती साठी प्रथम १५००१ रू.,द्वितीय १०००१ रू.,तृतीय ७००१ रू.,

 

जनरल घोडागाडी शर्यती साठी प्रथम ११००१ रू.,द्वितीय ७००१ रू.,तृतीय ५००१ रू.बिनदाती घोडागाडी शर्यती साठी प्रथम ५००१ रू.,द्वितीय ३००१ रू.,तृतीय २००१ रू. अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून या शर्यती बोरगाव ते आयको पट्टा प्रोसेस जवळ घेण्यात येणार असून या शर्यती मैदानाचे उदघाटन आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते,माजी मंत्री विरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

 

तर बक्षीस वितरण माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते आमदार गणेश हुक्केरी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे,माजी आमदार सुभाष जोशी, ढोणेवाडी येथील गजानन महाराज संस्थेचे अध्यक्ष शिवाजी माळी सर,दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी शिवाप्पा माळगे,बाळासाब कमते,सिद्धार्थ हवले, संजय हवले,विद्याधर अम्मनवर,अजित रोड्ड,सुनिल गोरवाडे,कुमार फिरगनवर,सुकुमार चिप्रे,मारुती निकम, आण्णासाहेब बारवाडे,नरसू बंकापुरे,यांच्यासह अन्यजन उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!