अभिनव बालमंदिर प्राथमिक व माध्यमिक,वार्षिक स्नेहसमेलन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पटेल मल्टीपर्पज हॉल येथेउत्साहात पार पडला. ‘ मातृत्व संस्कृती व देशभक्ती या विषयावर’ कार्यक्रम सादर झाला तसेच प्राथमिक व माध्यमिक विध्या मंदिर विलासनगर हि प्रशाला २५ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत.सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शिरोली गावाचे नाव उज्ज्वल करावे तसेच शाळेतील सर्व माता भगिनींना राजमाता जिजाऊ सारखे आपल्या पाल्यांना घडवावे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांच्यासारखे बुद्धिवान व कर्तुत्वान होण्याचे ध्येय ठेवावे असे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलास नगरच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. बालवाडी ते दहावी या वर्गातील मुलांनी मातृत्व व देशभक्ती आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक सदाशिव पाटील , सौ. माधवी पाटील हे होते .शिरोली ग्रामपंचायतचे महिला लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे व ग्रा .प सदस्य, सदस्या , जयश्री पाटील उडान मंच अध्यक्ष , डॉ .सचिन अजगेकर सेक्रेटरी लायन्स क्लब कोल्हापूर , जितेंद्र बामणे मॅनेजर शिरोली मॅन्युफॅक्चर असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक ) राजन पाटील मॅनेजर BOI प्राचार्य सर्जेराव पाटील अध्यक्ष लायन्स क्लब कोल्हापूर, बाजीराव सातपुते मोहम्मद येळापुरे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन लोकनिक्त सरपंच सौ पद्मजा करपे ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,शाळेचे संस्थापक सचिव संचालक व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयचे लहू कांबळे , शशिकांत पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर सर यांनी मानले.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सौ.प्रतिभा पाटील सौ. सविता पाटील,सौ भाग्यश्री डोईफोडे यांनी केले सदर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा संस्थेचे अध्यक्ष एस, एन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वंदे मातरम या राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला

Spread the love
error: Content is protected !!