“तो” खून अनैतिक संबंधातून,तेलंगणा राज्यातील ३ आरोपी ताब्यात

“क्राईम” भारत येशाळ याचा अनैतिक संबंधातून खून, तेलंगणा राज्यातील ३ आरोपी ताब्यात

 

कोल्हापूर / प्रतिनिधी
हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघड,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील ३ आरोपींना केली अटक.भारत पांडुरंग येशाळ वय ३८, रा.रेणूकानगर झोपडपट्टी,मानस हॉटेलचे पाठीमागे, इचलकरंजी या ट्रक रिपेअरी करणा-या
मिस्त्रीला दि.०७ जानेवारी रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने फोन करुन गाडी खराब झालेली आहे असा बहाणा करुन कोरोची ते हातकणंगले जाणारे रोडवर असले चव्हाण टेक, हातकणंगले येथे बोलावून घेवून अज्ञात कारणावरुन,कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे गळ्यावर,हातावर,पोटावर,छातीवर, पाठीवर,हनुवटी व गालावर वार करुन त्याचा खुन केला होता.त्याबाबत मयताचे वडील पांडुरंग अनंत येशाळ यांनी दिले फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द हातकणंगले पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नंबर २४/२०२५ भा.दं.वि.सं.कलम ३०२ प्रमाणे खुनाचा दाखल करणेत आला होता.सदरचा गुन्हा रात्रीचे वेळी घडला होता तसेच गुन्ह्यातील मयतावर धारदार हत्याराने वार करुन निर्घुण खुन करणेत आलेने गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे पोलीसांना आव्हानात्मक होते.गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथक तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, संदिप जाधव,पोलीस अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे,खंडेराव कोळी,शिवाजी जामदार, वसंत पिंगळे,सचिन देसाई,महेश खोत,संजय इंगवले,आयुब गडकरी व रफिक आवळकर यांची ३ तपास पथके तयार केली.पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमुद पथकाने प्रस्तुत गुन्हा घडले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक व गोपनीय माहितीव्दारे सदरचा गुन्हा हा मिरियाला यादगिरी महेश रा.श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे,सायबराबाद,हैद्राबाद,राज्य तेलंगणा याने त्याचे साथीदारांसह केला असलेचे निष्पन्न केले.तदनंतर वरील पथकाने तेलंगणा राज्यात जावून,सापळा रचून गुन्हयातील आरोपीत मिरियाला यादगिरी महेश वय २६, गजुला सत्यनारायण शिवशंकर वय २७, मोहमद अमीर महंमद शरीफ खान वय २४, सर्व रा.श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे,सायबराबाद,जि.हैद्राबाद, राज्य तेलंगणा यांना ताब्यात घेतले.त्यांचेकडे कसून तपास केला असता यातील मुख्य आरोपी मिरियाला महेश याचे मयताचे पत्नीशी अनैतिक संबंध होते याची माहिती मयत यास असल्याने तो त्याचे पत्नीस सतत त्रास देवून मारहाण करीत असलेचे कारणावरुन सदरचा गुन्हा केला असलेची कबूली त्यांनी दिलेली आहे.नमुद आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी हातकणंगले पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आलेले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मा.अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई कोल्हापूर विभाग,अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे पाटील गडहिंग्लज विभाग,उप विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे जयसिंगपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पो.नि.प्रशांत निशाणदार, हातकणंगले पोलीस ठाणे तसेच पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे,संदिप जाधव,पोलीस अंमलदार चंदू ननवरे,राजीव शिंदे,खंडेराव कोळी,शिवाजी जामदार, वसंत पिंगळे,सचिन देसाई,महेश खोत,संजय इंगवले, आयुब गडकरी, रफिक आवळकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व प्रदिप पावरा सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
Spread the love
error: Content is protected !!