मलिकवाड मैदानावर रंगणार ११ लाखांचा बैलगाडी शर्यतीचा थरार

एकसंबा / प्रतिनिधी

लाखो रुपयांच्या बैलगाडी शर्यतीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मलिकवाड मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे.यंदाच्या विशाल तीर्थ यात्रेनिमित्त चिकोडीचे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली ११ लाख ११ हजार १११ रुपयांच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसासह पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांची बक्षीस असणाऱ्या बैलगाडी शर्यती सुप्रीम कोर्टाच्या बंदी नंतर स्थगित करण्यात आल्या होत्या.मात्र या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच बिरदेव यात्रे निमित्त खासदार अण्णासाहेब जोल्लेनी पुन्हा बैलगाडी शर्यती भरविण्याचा निर्णय घेतल्याने शर्यत शौकीनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

आज गुरुवारी सकाळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी एकसंबा मलिकवाड सह परिसरातील शर्यत शौकीन आणि कार्यकर्त्यांना आपल्या फार्म हाऊस बैठक घेतली. त्यानंतर खासदार जोल्ले यांनी येथे शर्यत भराविण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला.त्यानंतर नियोजित सुप्रसिद्ध शर्यत मैदानाची कार्यकर्त्यांनी पाहणी केली.

 

यावेळी ११ लाख रुपयांच्या पहिल्या बक्षीसासह ११ फेब्रुवारी रोजी सदर शर्यतीचे आयोजन करण्याचे जाहीर केले.यामुळे गेल्या कांही वर्षापासून मोठ्या मैदानापासून आलीप्त असलेल्या मलिकवाडच्या शर्यत मैदानावर पुन्हा शर्यतीचा थरार रंगण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून शर्यत शौकीनात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Spread the love
error: Content is protected !!