बाळासाहेबांची शिवसेना गटाचा पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव

जयसिंगपूर / प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित पडलेला 16 आमदार अपात्र,चिन्ह कोणाचे,मूळची शिवसेना कोणाची यावर बुधवारी शिक्का मोर्तब होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना बाजूने निकाल लागला.

 

हा आनंद उत्सव येथील क्रांती चौकात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रचंड फटाक्यांच्या आतिश बाजी,हलगीचा निनाद भगवे झेंडे आणि घोषणाने परिसर दणाणून गेला होता.परिसरातील लोकांना पेढे आणि साखर वाटण्यात आली.

 

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे म्हणाले शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले होते नेमकी शिवसेना कोणाची,चिन्ह कोणाचे , सोळा आमदार अपात्र या बाबीवर अखेर बुधवारी सायंकाळी पडदा पडला.

 

म्हणून आम्ही मोठ्या उत्साहाने हा आनंद उत्सव साजरा करीत आहोत.यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.

 

यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुकाप्रमुख सचिन डोंगरे,तालुका उपप्रमुख सुरज भोसले,युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल क्षीरसागर,तालुकाप्रमुख आकाश शिंगाडे,मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे गणेश कोळेकर, महिला आघाडीच्या छायाताई सूर्यवंशी,माधुरी टाकारे,

 

सुजाता पाटील,आसमा पटेल,सुनिता जाधव,संभाजी गोते,रतन पडियार,बजरंग भोसले,राजू भोसले,राजू सुतार, रमेश दंगेकर,विक्रम घोरपडे,शुभम मलमे,रोहित भिसे, सुनील क्षीरसागर,सुशांत मलमे,अण्णा नाईक,शिवाजी नंदीवाले,बाळू होगले,प्रणव होगले यांच्यासह

 

शिरोळ तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार ज्येष्ठ शिवसैनिक अशोक शिंगाडे यांनी मानले.

Spread the love
error: Content is protected !!