तेरवाड / प्रतिनिधी
तेरवाड ता.शिरोळ येथे पंचगंगा नदीला प्रदूषित पाणी आले आहे.माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडत आहेत.इचलकरंजी टाकवडे वेस येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता दोन प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी
पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन हरभट यांना प्रदूषित पाणी पाजून संताप व्यक्त केला.प्रश्नाची सरबत्ती करत कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही अशी भूमिका घेत अधिकारी हरबट यांना रोखले होते.दरम्यान प्रदूषण
नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रदूषण प्रश्नी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवून कारवाई करू असे अश्वासन दिल्याने अधिकाऱ्यांना घेराव मुक्त केले.
इचलकरंजी,कोल्हापूर या मोठ्या शहरातील सांडपाणी प्रक्रिये विना पंचगंगा नदीचे मिसळत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे.शेतकरी व शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थ कॅन्सर ग्रस्त झाले आहेत.
जनावरांनाही निरनिराळ्या आजाराची लागण होत आहे.इचलकरंजी आणि औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेविनाच थेट नदीत सोडले जात आहे.प्रदूषित पाण्याने कॅन्सर सारखा आजार बळावून जीवित हानी होत असतानाही प्रशासन याकडे
दुर्लक्ष करत असून मृत्यूच्या परिक्रमेची वाट पाहत आहे का?असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे,बंडू पाटीलसह शेतकऱ्यांनी पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या अधिकारी हरबट यांना करत त्यांना इचलकरंजी जल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्राची तपासणी
करावी असे सांगत त्यांच्यासोबत तपासणीसाठी गेले असता जर शुद्धीकरणाचे दोन प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले.संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी बाजीराव कांबळे यांना बोलवून घेत. त्यांच्यावरही प्रश्नांचा भडिमार करत कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया
केंद्राचा वीज पुरवठा बंद केल्याशिवाय आणि कारवाई केल्याशिवाय अधिकारी हरबट यांना सोडणार नाही अशी भूमिका घेत.संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी हर्बट यांना नदीतील प्रदूषित पाणी पाजत प्रश्नाची सरबत्ती करत संताप व्यक्त केला.यावेळी बाबुराव कोइक,
आप्पासाहेब चौगुले, सुहास कोळी, सागर पाटील,अभय आलासे,अरविंद सासणे,गोरख सासणे,सुनील सासणे,
शंकर सासणे,रवींद्र सासणे,उमेश चिंचवाडे सह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.