प्रगतशील शेतकरी नारायण साळुंखे व यशस्वी व्यावसायिक मंजुनाथ कामगौंडा यांचे होणार व्याख्यान
शिरोळ / प्रतिनिधी
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन शिरोळ तालुक्याच्यावतीने आज शुक्रवारी दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी शिरोळ तालुक्यातील सर्व
पत्रकारांचा गौरव सोहळा आणि प्रगतशील शेतकरी नारायण साळुंखे व यशस्वी व्यावसायिक मंजुनाथ कामगौंडा यांचे व्याख्यान असा संयुक्त सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यात तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आज सायंकाळी ४ वाजता संजय हॉल
नुसिंहवाडी – शिरोळ रोड नृसिंहवाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पुजारी यांनी केले आहे.शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नुसिंहवाडी शिरोळ मार्गावरील संजय हॉल नुसिंहवाडी येथे पत्रकार
दिनानिमित्त गौरवचिन्ह व गुलाबपुष्प देऊन तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.मयूर उद्योग समूहाचे चेअरमन डॉ संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र लचके संपादक व पत्रकार सेवा संघाचे
अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज आगे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार होणार आहे विजापूर जिल्ह्यातील गोळसंगी येथील प्रगतशील शेतकरी नारायण साळुंखे यांचे विक्रमी ऊस उत्पादन या विषयावर तसेच इंडी येथील यशस्वी व्यावसायिक मंजुनाथ कामगौंडा शेळी
मेंढी कुक्कुटपालन या व्यवसायास शासनाकडून मिळणारी सबसिडी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधवांनी संजय हॉल येथे आज सायंकाळी ४ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन विनोद पुजारी यांनी केले.
या पत्रकार सत्कार समारंभात तालुक्यातील सर्व पत्रकारांना महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघाचे सदस्यत्व देण्यात येणार आहे.त्यामुळे पत्रकारांनी येताना शिधापत्रिका व आधार कार्डचे छायांकित प्रत आणि २ आयडेंटी रंगीत फोटो सोबत घेऊन यावेत असे आवाहन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले.
पत्रकार सत्कार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे यानिमित्ताने मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे तसेच विविध दैनिकांचे संपादक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
प्रगतशील शेतकरी नारायण साळुंखे व यशस्वी व्यावसायिक मंजुनाथ कामगौंडा यांचे विचार ऐकण्यासाठी तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी केले.
पत्रकार संघाच्यावतीने तालुक्यातील पत्रकार बांधवांचा गौरव या सत्कार सोहळ्यात होणार आहे तसेच पत्रकारांना राज्य संपादक व पत्रकार सेवा संघात सभासद करण्यासाठी प्रमुख मान्यवर येत आहेत.
त्यांची भेट घेण्याकरिता सर्वच पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे यांनी केले.यावेळी संपादक विजय पवार,शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव अजित मांगुरकर,खजिनदार संतोष तारळे, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन
शिरोळ तालुकाध्यक्ष महेश पवार,उपाध्यक्ष रोहित तवंदकर,सचिव लंकेश कांबळे,खजिनदार संदीप नांद्रेकर, पत्रकार रमेश सुतार,सुरेश कांबळे,दर्शन वडेर,डॉ.दगडू माने यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.