भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व ग्रामीणच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा पूर्व ग्रामीणच्या अंतर्गत असणाऱ्या शिरोळ इचलकरंजी हातकणंगले शाहूवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघातून खेळाडू व युवकांनी नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत
यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार युवकांची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा नमो चषक प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होणार आहे या माध्यमातून युवकांचे संघटन होण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे क्रीडा प्रकारात कुस्ती कबड्डी
खो-खो रस्सीखेच धावणे सायकल फुटबॉल व्हाँलीबॉल क्रिकेट बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ तर सांस्कृतिक प्रकारात चित्रकला गीत गायन नृत्य स्पर्धा एकांकिका सादरीकरण वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या नमो चषक स्पर्धेसाठी प्रत्येक
विधानसभा मतदारसंघातील पन्नास हजार युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी भरघोस बक्षीस ठेवण्यात आले आहेत या स्पर्धेचे नेटके नियोजन शिरोळ इचलकरंजी हातकलंगले शाहूवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे.
२२ जानेवारी २०२४ पासून नमो चषक स्पर्धेत सुरुवात होणार आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावर विविध प्रकारची संयोजन समिती स्थापन करून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी शिरोळ इचलकरंजी हातकणंगले शाहूवाडी व पन्हाळा या विधानसभा मतदार संघातील
खेळाडू व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी नमो चषक या वेबसाईट वरती वेबसाईट वरती नाव नोंदणी करावी असे आवाहन डॉ अरविंद माने यांनी केले आहे.