अखेर शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरले

सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अखेर आज बुधवार (10 जानेवारी)रोजी लागला.या प्रकरणात ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.कोर्टात सुमारे वर्षभर सुनावणीवर सुनावण्या होत निकालाचा चेंडू अखेर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून 16 आमदारही पात्र असल्याचा ऐतिहासिक निकाल दिलाय.देशभराचं लक्ष लागलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.दि.20 जून 2022 रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी शिवसेनेतील आपल्या गटातील सुमारे 40 आमदार घेऊन बंड केल.त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची आणि कोण पात्र-अपात्र याचा संघर्ष सुरू होता.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण चालल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांकडे आल होत.त्यानंतर आमदारांच्या सुनावण्या पार पडल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल दिलाय.हा निकालाने मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Spread the love
error: Content is protected !!