क्रीडा स्पर्धामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो – मोहन माने 

शिरोळ / प्रतिनिधी

रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ या शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धाचा महोत्सव संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.मोहन माने यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले कि,विविध क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांचा सर्वागिण व व्यक्तिमत्व विकास
घडविण्यासाठी फार महत्वपूर्ण ठरतात. बौध्दिक विकासाबरोबर शारिरीक विकास सुदधा महत्वाचा असतो.ब्रिलियंट स्कूलचे  विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धामधून जिल्हा व राज्य स्तरावर शाळेचे नावलौकिक करत असतात.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या मा.जि प सदस्या सौ.इंद्रायणी पाटील यांनी  विद्यार्थ्यांनी या क्रीडा
स्पर्धाच्या महोत्सवामध्ये लंगडी,जिबली,भोवरा, विटूदाडी,लगोरी, रोपमलखाब इ.पारंपारिक खेळांचे प्रदर्शन दाखवले.ही परंपरा जोपासण्याचे काम ब्रिलियंट स्कूलने केले त्याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शाळेचे कौतुक करत या शाळेत विविध कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.व उत्तम संस्कार,शिस्त
इ.चे शिक्षण ही दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या संचालिका सौ.स्वाती माने यांनी विद्यार्थ्यांना खिलाडी वृत्तीने खेळावे तसेच हार-जीतकडे सकारात्म दृष्टीने पहावे असा मौलिक सल्ला दिला.यावेळी मा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,शिरोळ पंचायत समिती
गटशिक्षणाधिकारी मा.सौभारती कोळी, मा.नगरसेवक राजेंद्र माने,रोटरी क्लब शिरोळचे अध्यक्ष बाबुराव जाधव,विनायक माने,गजानन भोसले, उपस्थित होते.शाळेचे प्राचार्य पी.एस.काकडे यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले व क्रीडा शिक्षक संदिप
शहारे,सुपरवायझर्स सौ.शेहनाज शेख,सौ.ज्योति बरगाले,सौ.मेघा ढेकळे व सर्व शिक्षकांनी ही क्रीडा स्पर्धा यशस्वी केली. कु.प्राजंल कांबळे व कु.जोया मोमीन या विदयार्थीनीनीं कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
Spread the love
error: Content is protected !!