लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड येथील मंडल अधिकारी कार्यालयात येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालय शिरोळच्या वतीने ईव्हीएम मतदान मशीन व  आपण मतदान कोणत्या उमेदवाराला केले याची  माहिती

 

देणारे व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मशीन बाबत जाणून घेतले.येथील मंडल अधिकारी कार्यालयात शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत भारत सरकारने लोकसभा व विधानसभा

 

निवडणुक प्रक्रिया पारदर्शक व्हावी या दृष्टिकोनातून  मतदान प्रक्रियेतील नव्याने निर्माण केलेल्या व्हि.व्हि पॅट मशीनची प्रात्यक्षिके नागरिकांना दाखवण्यात आली.यावेळी मंडल अधिकारी बबन पटकारे,तलाठी

 

सूरज माने आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी माहिती देताना मंडल अधिकारी पटकारे म्हणाले निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी नागरिकांच्या मनातील ईव्हीएम मशीन बाबत असणारे

 

गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून व्हि.व्हि पॅट मशीन ची निर्मिती केली आहे.मतदाराने ईव्हीएम मशीनद्वारे  मतदान केल्यानंतर अवघ्या ७ सेकंदात ते मत कुणाला दिले,उमेदवाराचे चिन्ह,नाव असलेली चिठ्ठी व्हि.व्हि पॅट

 

मशिनमध्ये मतदाराच्या दृष्टीस पडणार आहे.मशिनमधील कागदावर नोंदवली गेलेल्या चिठ्ठीचा पेपर व त्यावरील शाई पाच वर्ष टिकणार आहे.त्यामुळे मतदारालाही  आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केल्याची खात्री  होणार असल्याचे सांगितले.यावेळी यावेळी एन.डी.

 

पाटील,भीमराव यादव,भीमराव पाटील,श्रीकांत आलासे, सुभाष शिंदे,आनंदराव पाटील, चंद्रकांत पाटील,सदानंद भोपे,सर्जेराव बाबर आदी नागरिकांनी माहिती जाणून घेतली.

Spread the love
error: Content is protected !!