मूत्रशय मार्गातील क्षार एकत्रित येऊन त्याचे खडे बनतात त्यालाच “मुतखडा”म्हणतात.हे खडे मोठे असल्यास मूत्र मार्गात अडकतात व प्रचंड वेदना यायला सुरुवात होते.
लक्षणे –
लघवीला साफ न होणे, लघवी गढूळ होणे, खाली पोटात व कंबरेत दुखणे,तोंडाला पाणी सुटणे, प्रसंगी उलट्या होणे, काहीवेळा बी.पी वाढणे.
तपासणी – सोनोग्राफी, सि. टी. ॲबडोमेन, xray
अपथ्य (काय खाऊ नये )-
बी असलेले पदार्थ, टोमॅटो,वांगी,पेरू,डाळिंब,पालक,दही, बोर पाणी,नॉनव्हेज, मासे,कॅलसिअम गोळया,चहा कॉफी.
पथ्य (काय खावे)-
नारळ पाणी,लाल कुळीथ, कवाळे, उसाचा रस, देशी केळी, नदीचे पाणी, कांदा
आयुर्वेदिक औषधे –
वरुनादी काढा,गोक्षुरादी गुग्गुळ,पाषाणभेद.
आयुर्वेदिक उपाय –
पाषाणभेद, सज्जी क्षार, यवक्षार, हजरुल यहूद भस्म, वरुण चूर्ण एकत्रित घेऊन, कोमट पाण्यासोबत पिणे
2) आपट्याच्या पानांचा काढा करून पिणे.
3) लाल कुळीथचे माडगे /आमटी/सूप करून प्यावे
4) आघाड्याचा रस करून पिणे.
5) 1 चमचा ऐरेंडेल तेल जेवणाअगोदर पिणे यामुळे मुतखडा पुढे सरकतो व वेदना कमी होतात.
6) उसाचा रस मूत्रल असल्याने दररोज 1ग्लास प्यावा.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723405,7028612340