जोल्ले समूहाकडून खेळांना प्रोत्साहन – बसव प्रसाद जोल्ले
चिक्कोडी / प्रतिनिधी
जोल्ले समूहाकडून पहिल्यापासून खेळांना प्रोत्साहन दिले आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा घेऊन ग्रामीण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून दिले आहे.यापुढेही विविध स्पर्धा आयोजित केल्या
जातील,असे जोल्ले समूहाचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी सांगितले.खासदार अण्णासाहेब जोल्ले चषक चिक्कोडी-सदलगा मतदारसंघ मर्यादित कबड्डी स्पर्धाचे एकसंबा येथे उदघाटन करून ते बोलत होते.खडकलाट आप्पाणावर मठाचे शिवबसव स्वामी यांच्या हस्ते श्रीफळ
वाढवून फित कापून कब्बडी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.युवा नेते बसवप्रसाद जोल्ले पुढे म्हणाले, जोल्ले समूहाकडून प्रो कबड्डीच्या आधी आशा स्पर्धा आयोजन केल्या आहेत.याशिवाय सर्व भागात युवकांसाठी बरेच काम केले आहे.युवकांसाठी गावागावांत जिम साहित्य
दिले आहे.सर्व खेळांत ग्रामीण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून दिले. आठ विधानसभा मतदारसंघात या स्पर्धा होत आहेत.या आठ मतदारसंघातून पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी चार संघात अंतिम सामने होतील.
खडकलाट आप्पाणावर मठाचे शिवबसव स्वामी म्हणाले,
तरुणांच्या आरोग्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत.
खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांचे कार्य सर्वांना उपयुक्त आहे. युवकांनी या खेळांत भाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे.
बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर हालशुगर कारखान्याचे संचालक कल्लाप्पा जाधव,अनवर दाडीवाले,हुमायून पटेल, यासीन तांबोळे, शिवराज जोल्ले व मान्यवर उपस्थित होते.भाजपचे मंडल अध्यक्ष संजय पाटील यांनी
स्वागत केले.महिला 14, पुरुष 55 संघ सहभागी यापूर्वी आठ विधानसभा मतदारसंघात या स्पर्धा झाल्या आहेत. चिक्कोडी मतदारसंघासाठी असलेल्या स्पर्धेत महिलांच्या 14 संघांनी तर पुरुष गटातून 55 संघांनी सहभाग घेतला आहे.