महाराष्ट्र राज्यातील असंविधानिक शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कृपाशीर्वादाने अनेक उद्योग गुजरातकडे जात आहेत.हे राज्याचं मंत्रालय गुजरातकडे गेल्यास आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय.उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो,असं सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 आमदार बाद होऊन अपात्र होतील,असा विश्वास व्यक्त केलाय.या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की,महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
