कल्लाप्पांना आवाडे जनता बँकेच्या आगमनाने बोरगावच्या आर्थिकीकरणात भर
बोरगाव / प्रतिनिधी
सीमाभागात व्यापार व उद्योग व्यवसायाचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या बोरगाव ता.निपाणी येथे इंचलकरंजीच्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या 45 व्या शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक ,माजी खासदार कलाप्पांना आवाडे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
बोरगावात शेड्युल बँक रूपाने शहरातील ही पहिलीच संस्था स्थापन झाल्याने बोरगावच्या आर्थिकीकरणात पुन्हा भर पडून शेतकरी,व्यवसायिक व नोकरदारांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या या शाखेत पहिल्याच दिवशी 10 कोटीच्या ठेवी जमा झाल्या असल्याचे संस्थेचे चेअरमन स्वनिल आवाडे यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून लॉकर पूजन करण्यात आले.बोरगाव सह पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या 45 व्या शाखेचा शुभारंभ थाटात करण्यात आला.
दरम्यान सद्या संस्थेचे 73 हजार 407 सभासद आहेत. संस्थेच्या 2400 कोटींवर ठेवी असून,1500 कोटींवर संस्थेने कर्जे दिली आहेत.त्यामुळे आपण भागातील शेतकरी सभासद व व्यसायिकांच्या शैक्षणिक,सामाजिक उद्धार व आर्थिक उन्नतीसाठी कल्लापणा आवडे इचलकरंजी जनता शेड्युल बँकेची स्थापना बोरगाव
नगरीत केली असून आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे, व्हाईस चेअरमन संजयकुमार अनिगोळ, सौ किशोरी आवाडे,राहुल आवाडे ,सौ वैशाली आवाडे,चंद्रकांत चौगुले,बंडोपंत लाड,
बाबुराव पाटील, महेश सातपुते, गुंडा गोरे,अशोक अम्मनावर,अशोक सौदत्तिकर,सुनील पाटील ,शितल अम्मनावर, मनोहर जोशी,अण्णासाहेब हवले, शरद जंगटे, डॉ.शंकर माळी,सचिन केस्ती, सुमेरो पाटिल, द्वारकाधीश सारडा,बाळकृष्ण पोवळे,भूपाल कागवाडे, सी.ई.ओ. संजय शिरगावे,जनरल मॅनेजर आण्णासाहेब नेरले, शाखा व्यवस्थापक भरत रुगे यांच्यासह अन्य उपस्थित होते.